Mumbai Crime : मुंबईत भोंदू फकीर अटकेत; उपचाराच्या नावाखाली महिलांवर अत्याचाराचा आरोप

मुंबई : नाशिक आणि संगमनेरमधील भोंदूबाबांच्या प्रकरणांची चर्चा अजून थंड झालेली नसतानाच मुंबईतही अशाच प्रकारचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. स्वतःला फकीर बाबा म्हणवून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदू फकीराला पोलिसांनी अटक केली आहे. महिलांना त्यांच्या वैयक्तिक समस्या आणि दुःखावर उपाय सांगण्याच्या नावाखाली जाळ्यात ओढून त्यांना बेशुद्ध करून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप या आरोपीवर करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव इरफान नियाज अहमद (वय ३४) असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील बहराइच येथील रहिवासी आहे.


मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत वास्तव्यास होता. कांदिवली परिसरात स्वतःला फकीर बाबा म्हणून ओळख निर्माण करून लोकांचा विश्वास संपादन करत होता. विशेषतः महिलांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर धार्मिक विधी आणि उपचार करण्याचे आमिष दाखवत तो त्यांना फसवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.


कांदिवलीत राहणाऱ्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्या पतीच्या मृत्यूबाबत अचूक माहिती सांगून तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर तिच्यावर काही दोष असल्याचे सांगत तो दोष दूर करण्यासाठी विशेष विधी करण्याची गरज असल्याचे सांगितले. या बहाण्याने आरोपीने त्या महिलेला आणि तिच्या दोन मुलींना एका ठिकाणी बोलावून धार्मिक विधी सुरू केला. या विधीदरम्यान तिघींनाही बेशुद्ध करण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे.



बेशुद्ध अवस्थेचा फायदा घेत आरोपीने एका मुलीचा विनयभंग केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित महिलेनं तात्काळ कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम ७४, ७८, १२३ तसेच ३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी इरफान नियाज अहमद याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागे आणखी काही पीडित महिला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून अधिक तपास सुरू आहे. आरोपीने अशा प्रकारे किती जणांना फसवले आहे, याचा शोध घेतला जात आहे.


या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक श्रद्धा आणि अंधविश्वासाचा गैरफायदा घेऊन महिलांची फसवणूक करणाऱ्या अशा भोंदूबाबांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारच्या व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, असेही सांगितले आहे.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा