मुंबई : राज्यसभा निवडणुकीत अनुभवी नेत्यांना डावलून सामान्य शिवसैनिकाला संधी देणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषद निवडणुकीतही पुन्हा एकदा ‘धक्कातंत्र’ वापरण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेसाठी मावळत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली, तरी दुसऱ्या जागेसाठी मात्र शिवसेनेत इच्छुकांनी शड्डू ठोकल्याने पक्षात कमालीची चुरस निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश; नाशिक धर्मांतर आणि ड्रग्ज प्रकरणाचाही घेतला आढावा मुंबई : "भोंदू अशोक खरात प्रकरणात दोषी ...
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. शिवसेनेचे विधानसभेतील ५७ आमदारांचे संख्याबळ पाहता, दोन जागा सहज निवडून आणणे शिंदे यांच्यासाठी सोपे आहे. यातील एक जागा नीलम गोऱ्हे यांच्यासाठी जवळपास पक्की असली, तरी दुसऱ्या जागेवर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : महानगरपालिकेच्या अखत्यारितील "सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप (स्माईल) कॉन्सिल"च्या माध्यमातून मुंबईतील विविध ...
शिवसेनेच्या कोट्यातील दुसऱ्या जागेसाठी पक्षातील बड्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने रवींद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी आणि दीपक सावंत यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, राज्यसभेप्रमाणेच उपमुख्यमंत्री शिंदे येथेही एखाद्या सामान्य शिवसैनिकाला किंवा नव्या चेहऱ्याला संधी देऊन दिग्गजांना धक्का देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मंत्रिमंडळात खांदेपालट?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षात ‘भाकरी’ फिरवण्याचे संकेतही मिळत आहेत. काही अकार्यक्षम मंत्र्यांबाबत आमदारांमध्ये मोठी नाराजी असून, मतदारसंघातील कामे होत नसल्याच्या तक्रारी उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे काही मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची दाट शक्यता आहे.




