Friday, April 17, 2026

Iran Internet Restored : तब्बल ४८ दिवसांनंतर इराणमध्ये Google Search सुरू; मात्र इंटरनेट सेवा अद्याप विस्कळीत

Iran Internet Restored : तब्बल ४८ दिवसांनंतर इराणमध्ये Google Search सुरू; मात्र इंटरनेट सेवा अद्याप विस्कळीत

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर जवळपास ४८ दिवस इंटरनेट निर्बंध सहन केलेल्या इराण मधील नागरिकांना अखेर अंशतः दिलासा मिळाला आहे. गुगल सर्च (Google Search) सेवा पुन्हा सुरू झाली असून लँडलाईन आणि मोबाईल इंटरनेटद्वारे ती वापरणे शक्य झाले आहे. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटी अजूनही विस्कळीतच आहे.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, Gmail सह इतर महत्त्वाच्या सेवा अजूनही बंद आहेत. यावरून इंटरनेट सेवा पूर्णपणे सुरळीत सुरु झाली नसल्याचे स्पष्ट होते.

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावानंतर इराण सरकारने कडक इंटरनेट निर्बंध लागू केले होते. या काळात सामान्य नागरिकांसाठी इंटरनेट जवळपास बंदच होते. केवळ सरकारी नेटवर्कशी जोडलेले किंवा व्हर्च्युअल प्रायवेट नेटवर्क (Virtual Private Network) वापरणारे काही लोकच इंटरनेट वापरू शकत होते.

या दीर्घकालीन निर्बंधांचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अहवालानुसार, सुमारे १.८ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असून ई-कॉमर्स, डिजिटल सेवा आणि लहान उद्योगांना मोठा फटका बसला आहे.

सरकारकडून टप्प्याटप्प्याने सेवा पूर्ववत केल्या जात असल्या तरी सर्व सेवा पूर्णपणे सुरू होण्यासाठी अजून काही काळ लागू शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >