मध्यपूर्वेतील (Middle East) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या 'अरामको' (Aramco) वर भीषण मिसाइल आणि ड्रोन हल्ला झाला आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यांना रोखण्यात अमेरिकेची अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम पूर्णपणे अपयशी ठरली आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
Nashik News : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध धरणांमधून शनिवारी देखील पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 8, 370 ...
सौदी अरेबियात स्फोटांचे सत्र आणि वीज पुरवठा खंडित
सौदी अरेबिया आज सकाळी सलग झालेल्या मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांमुळे हादरून गेला. या हल्ल्यामध्ये सौदीच्या जिजान (Jizan) औद्योगिक शहरात जोरदार स्फोटाचे आवाज ऐकू आले. जिजानमधील सौदीच्या एका अत्यंत महत्त्वाच्या केंद्राला मिसाइल हल्ल्यामध्ये थेट टार्गेट करण्यात आले. या हल्ल्यामुळे जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीच्या सुविधांना मोठा धोका निर्माण झाला आहे. हल्ल्यानंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून अनेक भागांमधील वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला आहे.
- कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचे आवाहन मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान ...
येमेनमधून झाला हल्ला; हूती बंडखोरांचा सहभाग
प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला येमेनमधून (Yemen) करण्यात आला असून, अरामकोशी संबंधित तेल सुविधा केंद्रांना विशेष लक्ष करण्यात आले आहे. येमेनमधून सौदी अरेबियाच्या जिजान, यानबू आणि दमाद या भागांवर मिसाइल आणि ड्रोनचा मारा करण्यात आला. या गंभीर परिस्थितीची दखल घेत सौदी सिविल डिफेन्स फोर्सने यानबू प्रांतासाठी तातडीने आपत्कालीन अलर्ट (Emergency Alert) जारी केला आहे.
Shalarth ID Scam : बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी तथा तत्कालीन शिक्षणाधिकारी ६६ वर्षीय शशिकांत ...
जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता
अरामको ही जगातील ऊर्जा क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असल्याने, या हल्ल्यात नेमके किती नुकसान झाले आहे, याबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे जगातील अनेक देशांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण या हल्ल्याचा थेट आणि विपरीत परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर तसेच पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्यावर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
जम्मू : खराब हवामानामुळे आणि भूस्खलनामुळे सहा दिवसांपासून थांबलेली वार्षिक अमरनाथ यात्रा आजपासून म्हणजेच शनिवार, २५ जुलैपासून जम्मू येथून पुन्हा ...
शांतता करार मोडला, लाल समुद्रातील व्यापारावर संकट
सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात आधीच युद्धजन्य परिस्थिती असताना, सौदी अरेबिया आणि येमेनमधील हूती (Houthi) बंडखोरांमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. शुक्रवारी रात्री सौदी अरेबियाने येमेनमधील हूतींच्या नियंत्रणाखाली असलेल्या होदेइदा शहरावर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्याचा बदला म्हणून हूतींनी सौदीच्या तेल प्रकल्पांवर आणि लाल समुद्रातील तेल टँकर्सना ड्रोन व मिसाइलने टार्गेट केल्याचा दावा केला आहे. या घडामोडींमुळे दोन्ही बाजूसांमधील २०२२ पासून चालत आलेला शांतता करार आता अधिकृतपणे मोडताना दिसत आहे. या सततच्या संघर्षामुळे लाल सागर मार्गावरील जागतिक व्यापाराची सुरक्षा धोक्यात आली असून, आगामी काळात आंतरराष्ट्रीय राजकारणात याचे गंभीर परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे.






