पॅरिस : युरोपमधील स्पेन आणि फ्रान्स या देशांमध्ये भीषण वणव्याने (France Wildfire) थैमान घातले असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हजारो हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून किमान एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ६५ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. हजारो अग्निशमन कर्मचारी आणि हवाई दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असले तरी दोन्ही देशांतील प्रशासनाने पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. (France Wildfire)
फ्रान्समध्ये विक्रमी वणवा; लाखो नागरिकांना हलवले
फ्रान्समध्ये विशेषतः बोर्दो (Bordeaux) परिसरासह गिरोंद, लँड्स, वार आणि टार्न या भागांमध्ये आगीने मोठे नुकसान केले आहे. फ्रान्सचे गृहमंत्री लॉरेंट न्युनेझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १ लाख ९८ हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांना तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये हलवण्यात आले असून काही भागातील परिस्थिती सुधारल्यानंतर सुमारे ३ हजार नागरिकांना घरी परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. (France Wildfire)
गडचिरोली : गडचिरोलीच्या राजकारणात (Politics) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने ...
फ्रान्समध्ये या वणव्यामुळे आतापर्यंत सुमारे ९८ हजार हेक्टर जंगल जळून खाक झाले असून हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या वणव्यांपैकी एक असल्याचे सरकारने म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी प्रभावित नागरिकांना दिलासा देताना, "आपण पुन्हा उभे राहू," असा विश्वास व्यक्त केला. (France Wildfire)
स्पेनमध्येही आगीचा कहर; ६० हजार नागरिकांचे स्थलांतर :
स्पेनमध्ये राजधानी माद्रिदच्या पश्चिमेकडील गावांमधून सुमारे ६० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. याशिवाय माद्रिद आणि अविला परिसरातील जवळपास ८८ हजार नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, व्हॅलेन्सियाजवळील आणखी एका वणव्यात ७८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. हालचालींवर मर्यादा असल्याने तो आपल्या फळबागेजवळ आगीत अडकला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. (France Wildfire)
'पुढील काही तास कठीण' – प्रशासनाचा इशारा
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी जीव वाचवणे हेच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. तर स्पेनचे गृहमंत्री फर्नांडो ग्रांदे-मार्लास्का यांनी हवामानाची साथ मिळत नसल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली. फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकॉर्नू यांनीही आगामी काही तास अत्यंत आव्हानात्मक असतील, असा इशारा दिला आहे. (France Wildfire)
नवी दिल्ली : तब्बल ३६ दिवस घोषणाबाजी (Sloganeering), आंदोलन (Protest) आणि विद्यार्थ्यांच्या (Students) गर्दीने गजबजलेलं जंतर-मंतर (Jantar Mantar) आता शांत झालं आहे. केंद्रीय ...
हजारो अग्निशमन कर्मचारी रणांगणात :
हवामान बदलामुळे संकट तीव्र :
तज्ज्ञांच्या मते, मे महिन्यापासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटा, दीर्घकालीन दुष्काळ आणि हवामान बदलामुळे जंगले कोरडी पडली असून त्यामुळे वणवे वेगाने पसरत आहेत. युरोप हा हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या खंडांपैकी एक असल्याचेही वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे. सध्या स्पेन आणि फ्रान्समध्ये वणव्याविरोधातील लढाई सुरू असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. (France Wildfire)
View this post on Instagram






