सिएटल : अमेरिकेतील सिएटल शहरात एका लोकप्रिय फूड फेस्टिव्हलदरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बाइट ऑफ सिएटल (Bite of Seattle) फेस्टिव्हलमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना शहराच्या प्रसिद्ध स्पेस नीडल (Space Needle) स्मारकापासून अवघ्या एका ब्लॉक अंतरावर घडली. (Seattle Food Festival Firing)
सिएटल पोलिसांनी (Seattle police) दिलेल्या माहितीनुसार, सिएटल सेंटर परिसरात संध्याकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. घटनेनंतर पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली असून हल्लेखोराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Seattle Food Festival Firing)
पॅरिस : युरोपमधील स्पेन आणि फ्रान्स या देशांमध्ये भीषण वणव्याने (France Wildfire) थैमान घातले असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हजारो हेक्टर जंगल आगीच्या ...
फेस्टिव्हलमध्ये अचानक माजली दहशत :
गोळीबाराच्या वेळी Bite of Seattle फेस्टिव्हल सुरू होता. या कार्यक्रमात शेकडो स्थानिक विक्रेते, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि लाईव्ह म्युझिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असताना अचानक गोळीबाराचा आवाज घुमला आणि काही क्षणांतच परिसरात गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्यांनी ७ ते ८ गोळ्यांचे आवाज ऐकले. त्यानंतर लोकांनी जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धाव घेतली. गर्दी इतकी होती की अनेकांना हालचाल करणेही कठीण झाले होते. (Seattle Food Festival Firing)
गोळीबारानंतर घबराटीचे वातावरण :
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, गोळीबार सुरू होताच लोक एकमेकांना धडकत पळू लागले. संपूर्ण परिसरात काही वेळासाठी अराजक आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये गोळीबारानंतर नागरिकांची झालेली धावपळ आणि गोंधळ दिसून येत आहे. जखमींना तातडीने हार्बरव्ह्यू मेडिकल सेंटर (Harborview Medical Center) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून हल्लेखोर ताब्यात आहे की नाही, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. (Seattle Food Festival Firing)
मध्यपूर्वेतील (Middle East) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या 'अरामको' (Aramco) ...
३५ वर्षांहून अधिक जुना फेस्टिव्हल रक्तरंजित :
बाइट ऑफ सिएटल (Bite of Seattle) हा सिएटलमधील प्रसिद्ध वार्षिक फूड फेस्टिव्हल असून त्याची सुरुवात १९८२ मध्ये झाली होती. या तीन दिवसांच्या महोत्सवाला दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. मात्र यंदा उत्सवाच्या ठिकाणी झालेल्या गोळीबारामुळे आयोजक आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. (Seattle Food Festival Firing)




