मुंबई : एलपीजी उपलब्धतेबाबत ग्राहकांमध्ये विश्वास आणि सकारात्मक बदल दिसून येत आहेत. इंधन टंचाईची भीती आणि त्यादरम्यान होणारी अतिरिक्त खरेदी आता कमी झाली आहे. दरम्यान ग्राहकांचा आत्मविश्वास वाढला आहे. शासनाने केलेली कडक कारवाई, नियमित पुरवठा आणि पारदर्शक उपायांमुळे विनाअडथळा गॅस मिळण्याची खात्रीही ग्राहकांना पटली आहे. यामुळे ग्राहक अधिक जागरूक झाले आहेत. परिणामी अतिरिक्त साठा कमी झाला असून डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे.
मुंबई : मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) परिसरात म्हणजेच बीकेसी परिसरात आज सकाळी (बुधवार, १५ एप्रिल) सकाळी मेट्रोच्या कामादरम्यान एक मोठी दुर्घटना ...
त्याचबरोबर, इतर क्षेत्रांमधील पुरवठाही स्थिर ठेवण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अन्न प्रक्रिया, वस्तू निर्मिती आणि शेतीशी संबंधित मोठ्या कामांसाठी लागणाऱ्या इंधनाचा पुरवठा आता पुन्हा नियमित करण्यात आला आहे. २३ मार्चपासून १० लाखांहून अधिक व्यावसायिक सिलिंडरची विक्री झाली आहे.





