मुंबई : मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) परिसरात म्हणजेच बीकेसी परिसरात आज सकाळी (बुधवार, १५ एप्रिल) सकाळी मेट्रोच्या कामादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. मेट्रोच्या खांबावर बीम बसवताना अचानक क्रेनचा तोल गेल्याने क्रेनसह भलामोठा बीम खाली कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही कामगार किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मदतकार्य वेगात सुरु :
घटनेची माहिती मिळताच एमएमआरडीए आणि एमएमआरसीची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. कोसळलेली क्रेन आणि बीम हटवण्यासाठी अवजड यंत्रसामग्रीची मदत घेतली जात असून काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, तांत्रिक बिघाड की सुरक्षा नियमांचे उल्लंघन याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
- २०२७-३० साठी मोठं राजनैतिक यश मुंबई : २ एप्रिल २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या इकोनॉमिक अँड सोशल कॉन्सिल कॉनशील (ECOSOC) अंतर्गत विविध महत्त्वाच्या ...
मेट्रो बांधकामादरम्यान पिलरवर बसवताना मोठा बीम खाली कोसळल्याने अपघात . .#prahaarnewsline #MarathiNews #MumbaiMetro #BKCMetro #BKC #metroaccident pic.twitter.com/rZx0xweM3M
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) April 15, 2026
अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम :
पर्यायी मार्ग:
कुर्ल्याकडे जाणारी वाहतूक डायमंड मार्केट गेट क्रमांक ८ मार्गे वळवण्यात आली आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे/भारत नगरकडे जाण्यासाठी डायमंड मार्केट सिग्नलवरून डावे वळण घेण्याचा सल्ला. प्रशासनाने नागरिकांना या मार्गाचा वापर टाळण्याचे आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.






