बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडत सम्राट चौधरी (Bihar CM Samrat Choudhary) यांनी राज्याचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून आज म्हणजेच बुधवार १५ एप्रिल रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सय्यद अता हसनैन यांनी पाटणा येथील लोक भवनात त्यांना शपथ दिली. त्यांच्या नियुक्तीमुळे बिहारमध्ये नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाल्याची चर्चा आहे.
सम्राट चौधरी हे भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री ठरले असून एनडीए सरकारमध्ये जेडीयू कोट्यातून विजय चौधरी आणि विजेंद्र प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
साध्या कुटुंबातून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास :
राजकारणातील मजबूत पायाभरणी :
सम्राट चौधरी यांनी १९९९ मध्ये राबडी देवी यांच्या सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांनी विविध महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत आपली ओळख मजबूत केली. २०१४ मध्ये जितन राम मांझी यांच्या मंत्रिमंडळातही त्यांनी नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून काम केलं.
आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे उपनेते अशोक मित्तल (Ashok Mittal ED) यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. आज म्हणजेच बुधवार ...
भाजपमधील वाढता प्रभाव :
पुढील आव्हाने मोठी :
मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आता सम्राट चौधरी यांच्यासमोर राज्यातील विकास, सामाजिक समतोल आणि राजकीय स्थिरता राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
एकूणच, सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बिहारच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, त्यांच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.



