Pratap Sarnaik : स्कूल बसचे भाडे आता सरकार ठरवणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

वाहनाचे लाईव्ह ट्रॅकिंग, पालकांना अलर्ट जाणार


मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. शालेय बसच्या भाडेवाढीला चाप लावत आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण स्कूल बसचे भाडे निश्चित करणार असून, पालकांकडून एकरकमी आगाऊ रक्कम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन) (प्रथम सुधारणा) नियम, २०२६’ या सुधारित नियमावलीचा मसुदा गृह विभागाने प्रसिद्ध केला असून, यावर १५ दिवसांत हरकती व सूचना नोंदवण्याचे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.


अनेक शाळा आणि बस कंत्राटदार पालकांकडून वर्षभराचे भाडे आगाऊ घेतात. नव्या नियमानुसार आता केवळ मासिक भाडेच आकारता येईल. तसेच, प्रत्येक शाळेत ‘स्कूल ट्रान्सपोर्ट कमिटी’ स्थापन करणे अनिवार्य असून, ही समिती भाडे आणि तक्रारींचे निवारण करेल. या समितीला दर तीन महिन्यांनी आपला अहवाल सादर करावा लागेल.



विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता केवळ सीसीटीव्ही पुरेसे नसून, प्रत्येक बस आणि व्हॅनमध्ये जीपीएस आधारित ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ आणि पॅनिक बटण बसवणे बंधनकारक असेल. वाहनाचे लाईव्ह ट्रॅकिंग, विद्यार्थ्यांची डिजिटल उपस्थिती आणि स्वयंचलित अलर्ट पालकांना मिळणार आहेत. बसेसमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा आणि सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आले आहेत.

महिला परिचारिकांची सक्ती


- पूर्व-प्राथमिक ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रवासादरम्यान प्रत्येक बसमध्ये महिला परिचारिका किंवा नियुक्त कर्मचारी असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची बसमध्ये चढताना आणि उतरताना वेळेसह नोंद ठेवावी लागणार आहे. तसेच, विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) मुलांसाठी प्रशिक्षित कर्मचारी आणि सुलभ प्रवेश व्यवस्थेची तरतूद मसुद्यात करण्यात आली आहे.
- त्याशिवाय चालक आणि वाहकांचे पोलीस व्हेरिफिकेशन आणि वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. हा नियम लागू झाल्यानंतर तीन महिन्यांत बदल न केल्यास वाहनाचा परवाना थेट रद्द होणार आहे. शिक्षण आणि परिवहन विभाग संयुक्तपणे बसेसची तपासणी करून जिल्हा समितीला अहवाल देणार आहे.

Comments
Add Comment

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी