Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी एक्स्प्रेस (Coimbatore–Jaipur AC Express) १३ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होत आहे. विशेष म्हणजे या गाडीला आता धरणगाव रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा देण्यात आला आहे. धरणगाव तालुक्यातील (Dharangaon Station) प्रवासी अनेक वर्षांपासून या थांब्याची मागणी करत होते. प्रवासी मंडळाने सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे (Railway Administration) पाठपुरावा केला. प्रवाशांची वाढती संख्या, राजस्थानकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यांची गरज तसेच दक्षिण भारताशी वाढणारा संपर्क लक्षात घेऊन ही मागणी सातत्याने लावून धरली होती. तसेच खासदार स्मिता वाघ (MP Smita Wagh) यांनीही रेल्वे मंत्रालयाकडे (Ministry of Railways) हा मुद्दा लावून धरल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत धरणगावला अधिकृत थांबा मंजूर केला.



धरणगाव थांब्याचे वेळापत्रक


गाडी क्रमांक ०६१८१ कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस (Coimbatore–Jaipur AC Express) प्रत्येक शुक्रवारी दुपारी २ वाजून ५८ मिनिटांनी धरणगाव स्थानकावरून जयपूरच्या दिशेने प्रस्थान करेल. तर गाडी क्रमांक ०६१८२ जयपूर–कोयंबतूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस प्रत्येक सोमवारी सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी धरणगाव स्थानकावर येऊन कोयंबतूरच्या दिशेने रवाना होईल. दोन्ही बाजूने धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक लक्षात घेता प्रवाशांना राजस्थानसह दक्षिण भारताकडे जाणे सोयीचे ठरणार आहे.



राजस्थानकडे जाण्यासाठी थेट सुविधा


धरणगाव स्थानकावरून (Dharangaon Station) जयपूरसह राजस्थानातील इतर शहरांकडे जाण्यासाठी उपलब्ध असणारी ही एकमेव थेट रेल्वे सेवा आहे. त्यामुळे प्रवाशांना जळगाव, भुसावळ किंवा इतर मोठ्या स्थानकांवर जाऊन रेल्वे बदलण्याची गरज राहणार नाही. राजस्थानमध्ये व्यवसाय, शिक्षण, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.



त्याचप्रमाणे कोयंबतूरमार्गे तामिळनाडू व दक्षिण भारतातील इतर शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही ही रेल्वे सोयीची ठरणार आहे. विशेष रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने मानले आहेत. तसेच या थांब्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या खासदार स्मिता वाघ यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. प्रवासी मंडळाचे अध्यक्ष तथा डीआरयूसीसी सदस्य महेंद्र कोठारी यांनी नागरिकांनी या रेल्वे सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे