Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार


मुंबई : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र भाजपच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत 'तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत १० ऑगस्ट रोजी मुंबईत एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सुमारे २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः रस्त्यावर उतरून रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. (BJP)


९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक रॅली पार पडतील. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे सर्व केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पदाधिकारी आपापल्या संपर्क क्षेत्रातील रॅलींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि नाशिक या प्रमुख शहरांसह सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल. या मोहिमेत विविध सामाजिक संस्था, मित्रपक्ष आणि समविचारी संघटनांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. मुंबईत १० ऑगस्ट रोजी निघणारी रॅली या संपूर्ण अभियानाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. (Tiranga Rally)



गेल्या काही दिवसांत 'नीट'सह विविध शैक्षणिक मुद्द्यांवरून देशपातळीवर तरुण वर्गाकडून आंदोलने उभी राहिली होती. या पार्श्वभूमीवर, तरुणांमधील असंतोष दूर सारून त्यांना पुन्हा पक्षाच्या व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी भाजपने या 'तिरंगा रॅली'चे नियोजन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी राजकीय आव्हाने लक्षात घेता स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि देशभक्तीच्या भावनेच्या माध्यमातून तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणावर पक्षाशी जोडून घेण्याची ही रणनीती मानली जात आहे. (Independence Day)

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व