पुन्हा चंद्रमाच्या दिशेने

५३ वर्षांनी मानवाने पुन्हा चंद्राच्या दिशेने पाऊल टाकले. यावेळी ‘नासा’ची ‘आर्टेमिस २’ ही मोहीम आहे. या मोहिमेद्वारे अंतराळवीर चांद्रप्रदक्षिणा पूर्ण करून पृथ्वीवर परतणार आहेत. १९७२ मधील अपोलो १७ मोहिमेनंतर मानवी अंतराळ प्रवासाच्या इतिहासातील ही सर्वात लांबची आणि महत्त्वाची मोहीम मानली जात आहे.


फ्लोरिडा येथील केनेडी अंतराळ केंद्रातून ‘स्पेस लॉन्च सिस्टम’ (एसएलएस) या महाकाय रॉकेटच्या साहाय्याने ओरियन अंतराळयान अंतराळात झेपावले. यात कमांडर रीड वाईजमन यांच्या नेतृत्वाखालील पथकात पायलट व्हिक्टर ग्लोव्हर, मिशन स्पेशालिस्ट क्रिस्टीना कोच आणि कॅनेडियन अंतराळ संस्थेचे जेरेमी हॅन्सन यांचा समावेश आहे. क्रिस्टीना कोच यांच्याकडे आधीच सर्वात लांब एकल अंतराळ प्रवासाच्या विक्रमाची पार्श्वभूमी आहे. या मोहिमेद्वारे त्या चंद्राच्या कक्षेत पोहोचणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. हे चारही तज्ज्ञ चंद्राच्या ‘फार साईड’चे म्हणजेच पृथ्वीवरून कधीही न दिसणाऱ्या भागाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणार आहेत. ही मोहीम केवळ चांद्रप्रदक्षिणा नाही, तर भविष्यातील मंगळ मोहिमा आणि चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती स्थापन करण्याच्या द़ृष्टीने एक महत्त्वाचा आधार ठरणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश मानवी अंतराळ प्रवासाच्या मर्यादा तपासणे आणि नवीन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष वातावरणात चाचणी करणे हा आहे. आर्टेमिस-२ ही एक ‘क्रूड फ्लायबाय’ मोहीम आहे.


याचा अर्थ असा की, अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावरउतरणार नाहीत, तर चंद्राच्या मागच्या बाजूने एक विस्तीर्ण वळण घेऊन पृथ्वीवर परततील. या दहा दिवसांच्या प्रवासात ओरियन यान पृथ्वीपासून सुमारे ३,९३,००० किलोमीटर अंतरापर्यंत मजल मारेल. हे अंतर अपोलो १३ मोहिमेने प्रस्थापित केलेला विक्रम मोडीत काढणारे ठरेल. हे यान पृथ्वीपासून २.३ लाख मैल दूर जाणार आहे. पण याचा खरा उद्देश ओरियन स्पेसक्राफ्टच्या जीवन प्रणालीचा अभ्यास करणे हा आहे. ही मोहीम काढण्यामागे मुख्य कारण आहे ते २००८ मध्ये नासाने चांद्रयान मोहीम काढली होती त्यात चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे दिले होते. त्याची पडताळणी करण्यासाठी ही मोहीम आखली आहे.


अर्थात यावेळी त्यांच्या मोहिमेचा उद्देश चंद्रावर जाऊन झेंडा उभारण्याचा नाही. तेव्हा अमेरिका आणि रशिया यांच्यात वैज्ञानिक वर्चस्वाची लढाई होती आणि त्यात वर्चस्व कोण राखते यावर प्राणपणाला लावून ती लढाई खेळली जात असे. पण आता तो काळ मागे पडला. रशियाही आता कोसळला आणि अमेरिका जगातील सर्वात बलवान राष्ट्र राहिले नाही.
आर्टिमिस हे विज्ञान आणि भू-राजकीय संघर्षात वेगळे युगाचे प्रतिनिधित्व करते. चीन आणि अमेरिकन अंतराळ स्पर्धेत चंद्र हे एकमात्र अग्रगण्य स्थान आहे. त्यासाठीच दोन्ही देशांचा संघर्ष आहे. आर्टेमिस हे जागतिक पवित्र्याबाबत व्यापक अंतराळ संशोधन आहे. या मोहिमेचा उद्देश अधिक व्यापक स्वरूपाचा आहे. चंद्रावर हिम सापडले होते आणि शास्त्रज्ञांचा अंदाज असा आहे, की चंद्रावर खड्डे आहेत आणि या हिमाचा उपयोग स्पेस स्टेशन बांधण्यासाठी करता येऊ शकतो का? तसेच चंद्रावर जीवरक्षक प्रणालीसोबत प्राणवायू आणि हायड्रोजन या वायूंचा उपयोग करून रॉकेट लॉंचर्ससाठी त्यांचा उपयोग करता येईल का? पण या मोहिमेने अमेरिकेची या अंतराळ वर्चस्वातील दादागिरी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे हे तर कबूल करावेच लागेल.


अमेरिकेची स्पर्धा आता रशियाशी नाही तर चीनशी आहे, हे या निमित्तान सिद्ध झाले. कारण चीन आणि अमेरिका यांच्यातील अंतराळ स्पर्धेला नवा आयाम या आर्टेमिस मोहिमेने दिला आहे. चंद्रीय अवकाशात या मोहिमेने नव्या स्पर्धेला तोंड फुटले आहे आणि अमेरिका आणि चीन यांच्यात तांत्रिक वर्चस्वासाठी जबरदस्त लढाई आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भू-राजकीय वर्चस्वासाठीही हे युद्ध आहे. या दृष्टीनेच नासाच्या या मोहिमेकडे पाहिले पाहिजे. चंद्राचा दक्षिण ध्रुव हा या स्पर्धेचे मैदान बनला आहे आणि दोन्ही राष्ट्रे संभाव्य पाण्याच्या स्पर्धेसाठी आणि स्त्रोतांसाठी त्यात उतरली आहे. अमेरिकेने या दिशेने सुरुवात केली आहे, तर चीन २०२८-२९ मध्ये चंद्रावर उतरून आपली मोहीम पार पाडणार आहे. आर्टेमिसचे महत्त्व हे आहे, की त्यातून जास्त सुपिरियर मानवी उड्डाण क्षमता कुणाची आहे हे सिद्ध करणार आहे. त्यामुळे अंतराळात आपले प्रथम स्थान निर्माण करून त्यावर राहणे हेच अमेरिकेचे उद्दिष्ट आहे.


अमेरिकेची मोहीम ही युरोप, कॅनडा आणि जपान यांच्या अंतराळ संशोधकांची मिळून बनलेली व्यापक आणि सर्वसमावेशक आहे, तर चीनची स्वतंत्र आहे.अर्थात चीनचा भागीदार रशिया आहे. आर्टेमिस यशस्वी परत आल्याने अमेरिकेचे वर्चस्व सिद्ध झाल्याने चीन या स्पर्धेत काहीसा मागे पडणार आहे. ही अंतराळ स्पर्धा केवळ द्विपक्षीय नाही, तर भारतासारख्या देशांनीही आपली ताकद अंतराळ वर्चस्वात दाखवून दिली आहे.


भारताने चंद्रीय प्रदेशात आपले वर्चस्व दाखवून केवळ हे दोन देशांतील युद्ध नाही, तर बहुदेशीय आहे, हे सिद्ध केले. आर्टेमिस हे अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण अंतराळ संशोधनात अमेरिका यातूनच आपले पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त करू शकते. चीनच्या प्रगत क्षमतांच्या संदर्भात अमेरिकेला आपली ताकद या मोहिमेद्वारे दाखवून देता येईल. आर्टेमिस ही दहा दिवसांची मोहीम असून त्यातून अमेरिका पुन्हा एकदा आपले चंद्रिय अवकाशात वर्चस्व सिद्ध करेल, तर चीनला त्याची मोहीम आणखी जोरकस करण्यासाठी प्रेरित करेल. अमेरिका आणि चीन यांच्यात आता नव्याने चंद्रासाठी स्पर्धा तयार झाली आहे आणि त्यात वर्चस्व कोण गाजवते यावर अंतराळ स्पर्धेचे भवितव्य ठरणार आहे. १९६१ मध्ये युरी गागारिन हा पहिला अंतराळ वीर ठरला होता. त्यानंतर अमेरिकेची चांद्रमोहीम झाली आणि त्यानंतर आता पुन्हा आर्टिमिस ही मोहीम पार पाडली.

Comments
Add Comment

पावसाळ्यात पोटाचे संक्रमण टाळा

पावसाळ्यात, दमटपणा आणि साचलेल्या पाण्यामुळे जीवाणू, विषाणू आणि बुरशी यांची झपाट्याने वाढ होते. पाण्याचे स्रोत

आपली मुले

आशय-वीणा सानेकर आम्हा सर्व मित्र-मैत्रिणींची मुलं तेव्हा लहान होती. आई-बाबा म्हणून आम्ही चुकत माकत घडत होतो आणि

महिला सक्षमीकरणाचा मानबिंदू

वेध-सीमा पवार   भारतीय सशस्त्र दलात महिलांचे वाढते योगदान हे देशाच्या बदलत्या सामाजिक आणि व्यावसायिक

रोजच्या ताटात विष!

प्रासंगिक-विवेक कांबळे   माणसाच्या मूलभूत गरजांपैकी सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या अन्नातच किती मोठ्या

बालपणाचा बदलता चेहरा

मागोवा-वैष्णवी भोगले   एखाद्या समाजाचे भविष्य काय असेल, याचा अंदाज त्या समाजातील मुलांच्या बालपणाकडे पाहून

वसईच्या ‘बशी’ला आता ‘देवा’कडूनच अपेक्षा!

निमित्त-गणेश पाटील   वसई-विरार शहराचा आकार बशीसारखा उंच-सखल असल्याने येथे दरवर्षी पावसाचे पाणी साचते,” हे