IPL 2026 Hardik Pandya : हार्दिक पांड्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातून बाहेर

मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आयपीएल २०२६ च्या सामन्यात खेळत नाहीये. हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादव मुंबईचे नेतृत्व करत आहे. सूर्यकुमारने मागील सामन्यात इम्पॅक्ट प्लेअरची भूमिका बजावली होती, पण या सामन्यात तो संघाचे नेतृत्व करत आहे. सूर्यकुमारने सांगितले की, हार्दिक आजारी असल्यामुळे या सामन्यात सहभागी होऊ शकत नाही.


दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्या या सामन्यात मुंबईकडून खेळत नाहीये. प्रभारी कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, हार्दिकची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे तो या सामन्याचा भाग नाही. दिल्लीने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही, तर दीपक चहर, कॉर्बिन बॉश आणि मिचेल सँटनर मुंबई संघात परतत आहेत.


नाणेफेकीच्या वेळी सूर्यकुमार हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबद्दल बोलताना म्हणाले, "हार्दिकची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे तो या सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त नाही. म्हणूनच तो आजचा सामना खेळत नाहीये." आज मी त्याची भूमिका बजावत आहे. अंतिम ११ क्रिकेटपटूंध्ये हार्दिकच्या जागी दीपक चहर, बोल्टच्या जागी कॉर्बिन बॉश आणि गझनफरच्या जागी मिचेल सँटनर यांना स्थान देण्यात आले आहे.


दरम्यान, दिल्लीने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. या हंगामातील हा त्यांचा पहिला घरच्या मैदानावरचा सामना आहे. त्यांनी यापूर्वी लखनौविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती आणि विजय मिळवला होता. कर्णधाराने यावेळी तोच संघ मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला