Ashok Kharat Case : भोंदू खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज म्हणजेच बुधवार १ एप्रिल रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


सध्या एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी सुरु आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली. अशोक खरातविरोधात नवनव्या तक्रारी दाखल होत आहेत. अशोक खरातने केलेलं लैंगिक शोषण, अनेकांना घातलेला आर्थिक गंडा आणि इतर अनेक कारनाम्यांची जंत्री वाढतच चालली आहे. त्यामुळे अशोक खरातची कोठडी वाढवण्याची मागणी एसआयटीकडून करण्यात आली. अशोक खरातवर दाखल असणाऱ्या अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात याधी तीनवेळा त्याला पोलीस कोठडी सूनवण्यात आली होती.



नेमकं प्रकरण काय?


अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार १८ मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

सोलापूर : घराच्या आवारात गांजाची लागवड; गुन्हे शाखेची धडक कारवाई, २१ किलो गांजासह आरोपी जेरबंद

सोलापूर : सोलापूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सहसा ग्रामीण भागात किंवा दुर्गम

Gadchiroli Naxal Surrender : गडचिरोलीत ९ जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण; शस्त्रसाठा जप्त

- छत्तीसगडच्या सुकमा २ मुली नक्षलवादी आल्या शरण गडचिरोली : गडचिरोली पोलीस दल आणि CRPF च्या संयुक्त मोहिमेला मोठे यश

Chhatrapati Sambhajinagar News : अजिंठा लेणीत मधमाशांचा पुन्हा धुमाकूळ; ११ पर्यटक जखमी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

संभाजीनगर : जागतिक कीर्तीच्या अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Pune – Sugar Factories : पुणे - साखर कारखान्यांकडे ४८९८ कोटी एफआरपी थकीत

पुणे : यंदाचा २०२५ -२६ चा ऊस गाळप हंगाम आता जवळपास संपला असून मोजकेच १० ते १२ कारखाने अद्याप सुरु आहेत. तरीसुध्दा

SBL Energy Blast : कंपनीचे मालक अजूनही ‘आऊट ऑफ रिच’

महिनाभरात तब्बल २६ कामगारांचा तडफडून मृत्यू नागपूर : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी

चंद्रपूर जिल्ह्यासाठी १ व ३ एप्रिल रोजी येलो तर २ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी

चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक १ व ३ एप्रिल