Gadchiroli Naxal Surrender : गडचिरोलीत ९ जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण; शस्त्रसाठा जप्त

- छत्तीसगडच्या सुकमा २ मुली नक्षलवादी आल्या शरण


गडचिरोली : गडचिरोली पोलीस दल आणि CRPF च्या संयुक्त मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. मंगळवार ३१ मार्च रोजी ९ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ वरिष्ठ एसीएम (ACM) स्तरावरील माओवाद्यांचा समावेश असून, या सर्वांवर मिळून ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. (Gadchiroli Naxal Surrender)


या कारवाईत विशेष बाब म्हणजे दोन महिला माओवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रांसह शरणागती पत्करली. शांती वंजा वड्डे हिने एके-४७ रायफल आणि ३० जिवंत काडतुसांसह आत्मसमर्पण केले, तर सुक्की बामी कुंजाम हिने कार्बाईन रायफलसह हिंसेचा मार्ग सोडला.



शस्त्रसाठा जप्त :


आत्मसमर्पणानंतर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील कुमनार व गुंडापुरी जंगल परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत शस्त्रसाठा जप्त केला. यात एसएलआर रायफल, वॉकीटॉकी, डेटोनेटर आणि पेनड्राइव्ह यांचा समावेश आहे.



छत्तीसगडच्या सुकमा २ मुली नक्षलवादी आल्या शरण :


गडचिरोली प्रमाणे छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानांतर्गत जानिला उर्फ मडकम हिंडमे (३०) आणि सोनी उर्फ मडवी कोसी (२४) या दोन महिला नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे, ज्यांच्यावर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीस होते. हे आत्मसमर्पण 'नक्षलमुक्त बस्तर' मोहिमेचा भाग असून यामुळे स्थानिक नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे



९ जहाल आत्मसमर्पित माओवादी :



  • दसली ऊर्फ पिडे सन्नु वेको (एसीएम) – बक्षीस ६ लाख

  • रामजी अडमा पोटाम (एसीएम) – बक्षीस ६ लाख

  • शांती वंजा वड्डे (एसीएम) – बक्षीस ६ लाख

  • मनकु मासो पोडाम – बक्षीस २ लाख

  • सरिता रामा वेलकम – बक्षीस २ लाख

  • लखमी आयतु कुंजाम – बक्षीस २ लाख

  • नंदे जोगा मडे – बक्षीस २ लाख

  • राकेश कोरके मज्जी – बक्षीस २ लाख

  • सुक्की बामी कुंजाम – बक्षीस २ लाख


माओवादी चळवळ शेवटच्या टप्प्यात :


गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली असून ती केवळ भामरागडच्या सीमावर्ती भागापुरती मर्यादित राहिली आहे. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या मोठ्या आत्मसमर्पणानंतर चळवळीला मोठा धक्का बसला होता. २०२५ पासून आतापर्यंत १३२ माओवाद्यांनी मुख्य प्रवाहात प्रवेश केला असून, एकूण आत्मसमर्पितांची संख्या ८०५ वर पोहोचली आहे.



पुनर्वसनासाठी शासनाची मदत :


आत्मसमर्पित माओवाद्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून ४.५ ते ५.५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. याशिवाय, गटाने आत्मसमर्पण केल्यास अतिरिक्त ४ लाख रुपयांचे प्रोत्साहन दिले जाते.



अधिकाऱ्यांची उपस्थिती :


या प्रसंगी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, CRPF चे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पोलीस दलाने माओवाद्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ घ्यावा आणि सन्मानाने जीवन जगावे.

Comments
Add Comment

Akola ZP : अकोला शिक्षक बदली प्रकरणात मोठी कारवाई; 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली

अकोला : अकोला (Akola) जिल्हा परिषद शिक्षण विभागातील आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई