Pune – Sugar Factories : पुणे - साखर कारखान्यांकडे ४८९८ कोटी एफआरपी थकीत

पुणे : यंदाचा २०२५ -२६ चा ऊस गाळप हंगाम आता जवळपास संपला असून मोजकेच १० ते १२ कारखाने अद्याप सुरु आहेत. तरीसुध्दा साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या एफआरपीची सुमारे ४ हजार ८९८ कोटी रुपये थकीत ठेवण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज वेळेवर परतफेड करण्याची बँकांची ३१ मार्च ही अखेरची तारीख आहे. कारखान्यांनी संपूर्ण रक्कम न दिल्यामुळे विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत राहण्याची दाट शक्यता असून साखर आयुक्तालयाने संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


थकीत एफआरपीप्रश्नी संबंधित कारखान्यांच्या वेळोवेळी सुनावण्या घेण्यात आल्या असून ३१ मार्चअखेरचा थकीतचा आकडा कमी होणे अपेक्षित आहे. कारखान्यांनी सुनावण्यांमध्ये रक्कम देण्याचे कबूल केले होते. एफआरपीची रक्कम वेळेत देण्याचे कारखान्यांवर बंधनकारक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेतही साखर उद्योगाच्या विविध प्रश्नांवर मागील आठवड्यात संयुक्त बैठक झालेली आहे. पुढील आठवड्यात थकीत एफआरपीचा पुन्हा आढावा घेऊन संबंधितांच्या सुनावण्या होतील व पुढील कारवाईची भुमिका ठरवू असे पुणे.साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितले .

Comments
Add Comment

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा