Chhatrapati Sambhajinagar News : अजिंठा लेणीत मधमाशांचा पुन्हा धुमाकूळ; ११ पर्यटक जखमी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

संभाजीनगर : जागतिक कीर्तीच्या अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी मधमाशांनी दोन वेगवेगळ्या सत्रांत पर्यटकांवर अचानक हल्ला चढवला, ज्यामध्ये देशी-विदेशी मिळून ११ पर्यटक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. गेल्या दोन महिन्यांत मधमाशांच्या हल्ल्याची ही पाचवी घटना असून, वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे प्रशासनाच्या उपाययोजनांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



एकाच दिवशी पर्यटकांवर सलग दोन हल्ले


अजिंठा लेणीत बुधवारी पर्यटकांना मधमाशांच्या भयावह हल्ल्याचा सामना करावा लागला. पर्यटकांची मोठी वर्दळ असताना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले झाले. पहिली घटना सकाळी लेणी क्रमांक १० जवळ घडली, जिथे मोहळातून अचानक बाहेर पडलेल्या मधमाशांनी पर्यटकांना लक्ष्य केले. या घटनेचा थरार संपत नाही तोच, तासाभराच्या अंतराने लेणी क्रमांक २६ परिसरात दुसऱ्यांदा मधमाशांनी हल्ला चढवला. या दुहेरी संकटामुळे पर्यटकांची प्रचंड धावपळ उडाली आणि अनेक पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले.



अजिंठ्यात दोन महिन्यात पाचवा हल्ला


गेल्या अवघ्या ६० दिवसांत मधमाशांच्या हल्ल्याची ही पाचवी वेळ असून, वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पर्यटकांमध्ये, विशेषतः महिला आणि बालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दररोज हजारो पाऊले पडणाऱ्या या पर्यटनस्थळी सुरक्षेसाठी तैनात असलेली यंत्रणा या मधमाशांसमोर हतबल ठरत आहे. जागतिक दर्जाचे केंद्र असूनही 'भारतीय पुरातत्व विभाग' (ASI) आणि पर्यटन विभाग कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही? असा संतप्त सवाल आता पर्यटकांकडून विचारला जात आहे. केवळ थातूरमातूर उपाय न करता, या मोहळांचा सुरक्षित बंदोबस्त करण्यासाठी तातडीने तज्ज्ञांची मदत घेण्याची गरज आहे. वारंवार होणाऱ्या या जीवघेण्या हल्ल्यांमुळे अजिंठ्याच्या जागतिक प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



पर्यटकांनी ही काळजी घ्या


प्रशासनाकडून पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे की, लेणी परिसरात फिरताना गडद रंगाचे कपडे टाळावेत आणि सुगंधित द्रव्यांचा (Perfumes) वापर करू नये. कारण यामुळे मधमाशा अधिक आक्रमक होण्याची शक्यता असते.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "