SBL Energy Blast : कंपनीचे मालक अजूनही ‘आऊट ऑफ रिच’

महिनाभरात तब्बल २६ कामगारांचा तडफडून मृत्यू


नागपूर : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत २६ कामगारांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १५ जण घटनास्थळी आणि ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या घटनेला एक महिना उलटून देखील कंपनीचे मालक संजय चौधरी आणि आलोक चौधरी यांचा ठाव ठिकाणी कळलेला नाही. तर कळमेश्वर पोलिसांना चौधरींवर गुन्हा दाखल करण्यापलिकडे अद्याप काहीच ठोस कारवाई करता आलेली नाही.


नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या राहुळगांव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड १ मार्च २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमाराला भीषण स्फोट झाला. एसबीएल एनर्जी लिमिटेड ही कंपनी खाणी, खनन आणि औद्योगिक वापरासाठी विविध प्रकारची विस्फोटके तयार करते. स्लरी एक्सप्लोसिव्ह्ज, इमल्शन एक्सप्लोसिव्ह्ज, बुल्क विस्फोटके, डेटोनेटर, डेटोनेटिंग फ्युज आणि कम कॉलम चार्ज विस्फोटके आदी उत्पादनात कंपनी कार्यरत आहे.


उपलब्ध माहितीनुसार, सदर कंपनी महाराष्ट्रात नोंदणीकृत असून तिचे मुख्यालय नागपूर शहरात आहे. कंपनीचा नोंदणी क्रमांक U24292MH2002PLC134851 असा आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक तथा मुख्य अधिकृत व्यक्ती म्हणून आलोक चौधरी यांचे नाव नोंद आहे.कंपनीची स्थापना २००२ साली ‘अमिन एक्सप्लोसिव्हज प्रा. लि.’ या नावाने झाली होती. त्यानंतर २०१६ मध्ये चौधरी कुटुंबाने कंपनीचे अधिग्रहण करून तिचे नाव बदलल्याचे आर्थिक अहवालांमधून समोर आलेय.


बारूद व स्फोटक उत्पादक कारखान्यांना परवाने देणे, सुरक्षिततेचे निरीक्षण करणे आणि नियमांची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी “पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन” (पेसो) यांच्याकडे असून पेसोचे मुख्यालयही नागपूरमध्येच आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या विस्फोटक कारखान्यांमध्ये वारंवार होणारे स्फोट, जीवितहानी आणि जखमींची वाढती संख्या यामुळे पेसोच्या निरीक्षण प्रक्रियेवर आणि नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एसबीएल एनर्जी लिमिटेड मधील स्फोटानंतर घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली. परंतु, अद्याप प्रशासनाला कगदी घोडे नाचवण्यापलिकडे काहीच करता आले नसल्याची खंत स्थानिकांकडून व्यक्त केली जातेय.



एसबीएलचे मलक अजूनही परांगदाच


गेल्या १ मार्च रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर एसबीएल एनर्जी लिमिटेडचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. याप्रकरणी २१ जणांना आरोपी बनवण्यात आले असून ११ जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु, कंपनीचे मालक संजय चौधरी आणि आलोक चौधरी दोघेही नॉट रिचेबल झालेत. या दुर्घटनेनंतर दोघेही देश सोडून पळल्याचीही शंका व्यक्त होत आहे. कारखान्यातील स्फोटाच्या दिवशी संजय चौधरी आणि आलोक चौधरी हे रविवारीच छत्तीसगडची राजधानी रायपूर येथून नागपूरला निघाले होते. दोघेही सायंकाळपर्यंत पोचतील असा दावा ग्रामीण पोलिस करत होते. मात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच ते नॉट रिचेबल झाले असून अजूनही पोलिसांसाठी आऊट ऑफ रिच आहेत. त्यामुळे या दुर्घटनेत तडफडून प्राण गमावणाऱ्या २६ जणांना नेमका न्याय कधी आणि कसा मिळेल..? असा प्रश्न त्यांचा कुटुंबिय विचारत आहेत.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास