सोलापूर : घराच्या आवारात गांजाची लागवड; गुन्हे शाखेची धडक कारवाई, २१ किलो गांजासह आरोपी जेरबंद

सोलापूर : सोलापूर शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सहसा ग्रामीण भागात किंवा दुर्गम शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केली जाते, मात्र सोलापूर शहरात चक्क एका राहत्या घराच्या आवारात गांजाची लागवड करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सोलापूर शहर गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे जप्त केली असून एका आरोपीला अटक केली आहे.



नेमकी घटना काय?


सोलापूर शहर गुन्हे शाखेला शहरातील एका भागात राहत्या घराच्या आवारात आणि समोरील मोकळ्या जागेत अमली पदार्थांची (गांजा) झाडे लावल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांना घराच्या परिसरात लावलेली गांजाची ५९ हिरवीगार झाडे आढळून आली. ही झाडे पाहून पोलीस अधिकारीही चक्रावून गेले.



मोठा मुद्देमाल जप्त


या छाप्यात पोलिसांनी तब्बल २१ किलो ४३९ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची बाजारपेठेतील अंदाजे किंमत ४ लाख ३९ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी ही सर्व झाडे उपटून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रजाक गफुर शेख या संशयित आरोपीला जागीच अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.



शहरात खळबळ


शहराच्या मध्यवस्तीत किंवा लोकवस्ती असलेल्या भागात अशा प्रकारे अमली पदार्थांची लागवड झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. हा गांजा केवळ स्वतःसाठी लावला होता की याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात होती, याचा तपास आता गुन्हे शाखा करत आहे. सोलापूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त