सततच्या आजारपणाने त्रस्त झाल्या सोनिया गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना तब्येत बिघडल्यामुळे मंगळवारी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात (एसजीआरएच) दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे तसेच छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल केले. सोनिया यांना तब्येतीच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल करण्याची अलिकडच्या काळातील ही काही पहिलीच वेळ नाही. मागील वीस वर्षांत सोनिया गांधी यांना दहा पेक्षा जास्त वेळा उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे सोनिया गांधी यांची तब्येत आता वारंवार बिघडते आणि त्या राजकारणात महत्त्त्वाची जबाबदारी हाताळण्यास सक्षम नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


कधी पोटदुखी तर कधी श्वास घेण्यास त्रास होणे तर काही वेळा छातीत दुखणे अशा वेगवेगळ्या कारणांसाठी सोनिया गांधी यांनी मागील वीस वर्षांत वारंवार रुग्णालयात उपचार घेतले आहेत.



सोनिया गांधी यांना मार्च २०२६ च्या आधी जानेवारी २०२६ मध्येही तब्येत बिघडल्यामुळे दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात (एसजीआरएच) दाखल केले होते. याआधी जून २०२५ मध्ये एकदा पोटदुखीसाठी आणि एकदा वैद्यकीय तपासण्यांसाठी असे एकूण दोन वेळा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल केले होते. फेब्रुवारी २०२५ मध्येही सोनिया यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. कोविड काळात तर सोनिया गांधी यांनी वारंवार वैद्यकीय तपासण्यांसाठी आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. अमेरिकेतील रुग्णालयातही सोनिया गांधी उपचार घेतले आहेत. वारंवार रुग्णालयात उपचार घेऊनही सोनिया गांधींच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरू आहेत.

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)