Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते टोकियो, नागोया आणि ओसाका इथे जाणार असून, जपानला जाणाऱ्या भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक शिष्टमंडळाचे ते नेतृत्व करत आहेत. या शिष्टमंडळात 200 हून अधिक व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश असून, त्यात उत्पादन, सेमी कंडक्टर, स्वच्छ ऊर्जा आणि पोलाद क्षेत्रापासून ते वाहन उद्योग, वित्तीय सेवा, आरोग्य सेवा आणि स्टार्टअप्स यांसारख्या विविध क्षेत्रांचा सहभाग आहे. भारत आणि जपान दरम्यान 'विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी' विषयी असलेल्या सामाईक महत्वाकांक्षेला अनुरूप असा हा दौरा असणार आहे. विशेष म्हणजे, दोन्ही देश परस्पर व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध लक्षणीयरीत्या दृढ करण्यासाठी उत्सुक असताना हा दौरा होत आहे.


पीयूष गोयल, टोकियोमध्ये भारताच्या विकास प्रक्रियेत दीर्घकाळापासून भागीदार असलेल्या जपानच्या प्रमुख उद्योगसमूहांच्या आणि औद्योगिक घराण्यांच्या सर्वोच्च नेतृत्वासोबत बैठक घेणार आहेत. यासोबतच 1,500 हून अधिक आघाडीच्या जपानी कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'केदानरेन' या जपानी उद्योग महासंघासोबत ते गोलमेज परिषदही घेतील. या दौऱ्यात सेमी कंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्ट-अप्स तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसोबत संवाद यावर विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यातून भारत एक गुंतवणूक आणि नवोन्मेषाचे केंद्र म्हणून अधिक आकर्षक ठरत असल्याचे दिसून येते. गोयल, जपानचे अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्री अकाजावा र्योसेई यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. तसेच ते जपान सरकार आणि संसदेतील वरिष्ठ सदस्यांशी भेट घेतील आणि जपानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधतील.



मध्य जपानमधील औद्योगिक केंद्र असलेल्या नागोया इथे, चुकेइरेन सेंट्रल जपान इकॉनॉमिक फेडरेशन आणि 'नागोया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोडशोचे नेतृत्वही पीयूष गोयल करतील. तसेच, ते आयची प्रांतातील नेतृत्व आणि ऑटोमोटिव्ह व पोलाद क्षेत्रातील प्रमुख उत्पादक गुंतवणूकदारांशी संवाद साधतील. या दौऱ्याची सांगता ओसाका येथे गुंतवणूकदार आणि व्यावसायिक रोड शोने होणार आहे. यासोबतच, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक आणि ग्राहक-केंद्रित क्षेत्रांतील आघाडीच्या जपानी कंपन्यांशी बैठका घेतल्या जातील; ज्याचा उद्देश भारतातील उत्पादन, स्वच्छ ऊर्जा आणि ग्राहक बाजारपेठांमधील संधींची माहिती देणे हा असेल.


गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि औद्योगिक सहकार्य या बाबतीत जपान हा भारताचा सातत्याने सर्वात विश्वासू भागीदार राहिला आहे. भारतातील वाहन उद्योग, पोलाद, इलेक्ट्रॉनिक्स, वित्तीय सेवा आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात जपानी कंपन्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विविध क्षेत्रांतील 200 हून अधिक प्रतिनिधींचा समावेश असलेल्या एका अभूतपूर्व व्यावसायिक शिष्टमंडळासह होणाऱ्या या दौऱ्यामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या संबंधांना नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, उच्च-तंत्रज्ञान उत्पादन आणि पुढच्या पिढीतील उद्योग — जे भारताच्या आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत @2047 या संकल्पनांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी निर्माण होतील.

Comments
Add Comment

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)

Blast in Gujarat : गुजरातमध्ये वाहनाच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नखत्राणा : गुजरातमधील कच्छच्या नखत्राणा परिसरात शनिवारी एका छोटा हत्ती वाहनात अचानक झालेल्या जोरदार स्फोटात