नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. विमान हवेत असतानाच केबिनच्या मागील भागात धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. या घटनेत पाच प्रवासी भाजल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना American Airlines Flight 2398 मध्ये घडली. विमानात १३३ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. विमान डॅलस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ पोहोचत असताना एका प्रवाशाच्या लॅपटॉपला अचानक आग लागली. (Laptop Fire on Flight)
केबिनमध्ये धूर आणि आगीच्या ज्वाळा :
लॅपटॉपला आग लागल्याचे लक्षात येताच विमानातील कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली. वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला विमानाच्या मागील भागात आग लागल्याची माहिती दिली. फ्लाइट अटेंडंट्सनी तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीचा धोका वाढू नये म्हणून जळणारा लॅपटॉप विमानाच्या मध्यवर्ती भागात हलवण्यात आला. या गोंधळात काही प्रवाशांच्या हातांना किरकोळ भाजल्याची माहिती आहे. एकूण चार ते पाच प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Laptop Fire on Flight)
टोकियो : जपानमध्ये रविवारी मध्यरात्री दोन वाजता कांटो प्रदेशात ५.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली. टोकियोच्या अदाची वॉर्डमध्ये आणि इबाराकी, ...
विमानाचे सुरक्षित लँडिंग :
घटनेनंतरही वैमानिकांनी विमानाचे सुरक्षितपणे डॅलस फोर्ट वर्थ विमानतळावर लँडिंग केले. विमान थेट गेटवर नेण्यात आले. विमानतळावरील वैद्यकीय पथक आणि आपत्कालीन सेवा तातडीने विमानाजवळ पोहोचल्या. जखमी प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एका प्रवाशाला घटनास्थळीच वैद्यकीय उपचार देण्यात आले आणि त्यानंतर त्याला सोडण्यात आले. (Laptop Fire on Flight)
कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात मैदानावरील वातावरण चांगलेच तापले. यशस्वी जयस्वालला बाद केल्यानंतर ...
क्रूच्या तत्परतेचे कौतुक :
घटनेनंतर अमेरिकन एअरलाइन्सने विमानाच्या क्रू मेंबर्सच्या तत्परतेचे कौतुक केले. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत जळणारे उपकरण नियंत्रित केले आणि परिस्थिती आणखी गंभीर होऊ दिली नाही, असे एअरलाइनकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे विमान प्रवासादरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सुरक्षित वापराबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Laptop Fire on Flight)