AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत अमेठीतील कोरवा आयुध निर्मिती प्रकल्पात पहिली १०० टक्के स्वदेशी AK-203 असॉल्ट रायफल यशस्वीपणे तयार करण्यात आली असून तिची प्राथमिक चाचणीही घेण्यात आली आहे. या रायफलला ‘शेर’ असे नाव देण्यात आले आहे.


AK-203 रायफल्सच्या स्थानिक उत्पादनासाठी भारत आणि रशियाने २०१९ मध्ये स्थापन केलेल्या इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडने (IRRPL) ही कामगिरी केली आहे. IRRPLचे CEO आणि MD मेजर जनरल एस. के. शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘शेर’ रायफलमधील प्रत्येक घटक आणि कच्चा माल भारतीय उद्योगातूनच मिळवण्यात आला आहे. त्यामुळे हे केवळ काही भागांचे स्थानिकीकरण नसून रायफलचे संपूर्ण स्वदेशीकरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (AK-203 Sher Rifle)



बर्स्ट फायरिंगसह चाचणी यशस्वी


पहिल्या १०० टक्के स्वदेशी AK-203 ‘शेर’ची बर्स्ट फायरिंगसह चाचणी घेण्यात आली असून, प्राथमिक निकाल उत्साहवर्धक असल्याचे IRRPLने सांगितले आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये भारतीय लष्कराच्या चाचण्यांसाठी १०० टक्के स्वदेशी प्रोटोटाइप तयार करण्याचे काम सुरू आहे.



दर १०० सेकंदाला एक रायफल तयार करण्याचे लक्ष्य


उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दिशेनेही IRRPL वेगाने काम करत आहे. लवकरच दर १०० सेकंदाला एक AK-203 ‘शेर’ तयार करण्याच्या उत्पादन दराकडे वाटचाल करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. क्षमता वाढ, स्वदेशीकरण आणि उत्पादन प्रक्रियेच्या अनुकूलनामुळे भारतीय लष्कराला सुमारे ६ लाख रायफल्सचा पुरवठा जवळपास एक वर्ष आधी करता येणार असल्याचेही IRRPLकडून सांगण्यात आले आहे.


जुन्या INSAS रायफल्सची जागा घेणार


AK-203 ही ७.६२x३९ मिमी क्षमतेची आधुनिक असॉल्ट रायफल असून ती कलाशनिकोव्ह प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. आधुनिक एर्गोनॉमिक्स, मॉड्यूलर ॲक्सेसरी रेल्स आणि लक्ष्यभेदन क्षमतेसह ही रायफल भारतीय लष्कराच्या गरजांनुसार विकसित करण्यात आली आहे. जुन्या होत चाललेल्या INSAS रायफल्सच्या जागी भारतीय लष्करात ६ लाखांहून अधिक स्थानिक बनावटीच्या AK-203 रायफल्स दाखल करण्याची योजना आहे.


अमेठीत १०० टक्के स्वदेशी AK-203च्या निर्मितीमुळे भारताच्या संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरतेला आणखी बळ मिळाले असून, देशांतर्गत संरक्षण उद्योगासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. (AK-203 Sher Rifle)


Comments
Add Comment

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)

Blast in Gujarat : गुजरातमध्ये वाहनाच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

नखत्राणा : गुजरातमधील कच्छच्या नखत्राणा परिसरात शनिवारी एका छोटा हत्ती वाहनात अचानक झालेल्या जोरदार स्फोटात

UGC : अमली पदार्थविरोधी अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC)