पुलगावमधील ४५०० घरांना मिळणार मालकी हक्क; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

मुंबई: वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील हिंगणघाट फैल परिसरातील सुमारे ४५०० कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भागातील जुना सर्व्हे नंबर ३६९ मधील घरांना मालकी हक्क देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आमदार राजेश बकाने यांनी विधानसभेत ही लक्षवेधी मांडली होती.


१ जानेवारी २०११ पूर्वीची घरे नियमित होणार


मंत्री बावनकुळे म्हणाले की, १ जानेवारी २०११ पूर्वी बांधण्यात आलेल्या घरांच्या नियमितीकरणासाठी राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेत आहे. या अंतर्गत पुलगावमधील रहिवाशांना त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड, खासगी सनद आणि अधिकृत नोंद अभिलेखात करून दिली जाईल. नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामीण भागात यासाठी विशेष समित्या नेमून जुन्या चुकीच्या नोंदी रद्द केल्या जातील आणि सर्वसामान्यांना त्यांच्या घराचा अधिकृत मालकी हक्क मिळवून दिला जाईल.

Comments
Add Comment

फोर्ट कंझर्वेशन प्राधिकरणाबाबत अभ्यास करण्यासाठी कमिटी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या बारा किल्ल्यांना युनोस्कोचा दर्जा मिळाला त्यासह राज्य शासनाकडून

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा

मुंबई : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा नियमित आहे.

राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र 'नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण' स्थापन होणार; मंत्री पंकजा मुंडे यांची विधानसभेत माहिती

मुंबई : राज्यातील नद्यांमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार आता एक मोठे पाऊल

पुणे - अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ‘ॲप’चा वापर

पुणे : शहरात होणारी अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

पुणे : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सुरू केलेल्या ‘पीटीपी’ (पुणे ट्रॅफिक पोलिस) अॅपच्या माध्यमातून

नाशिकमधील गृहनिर्माण घोटाळ्याची महिनाभरात चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई

मुंबई : नाशिक महापालिका क्षेत्रात गृहनिर्माण नियमांचे उल्लंघन करून गरीबांच्या घरांसाठी राखीव असलेल्या जागेवर