राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र 'नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण' स्थापन होणार; मंत्री पंकजा मुंडे यांची विधानसभेत माहिती

मुंबई : राज्यातील नद्यांमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार आता एक मोठे पाऊल उचलत आहे. केवळ नद्यांचे प्रदूषण नियंत्रण आणि पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतंत्र 'नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण' स्थापन करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला त्या उत्तर देत होत्या.



नद्यांची अवस्था चिंताजनक: ९६ टक्के सांडपाणी थेट पात्रात


राज्यातील नद्यांच्या सद्यस्थितीवर बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी धक्कादायक वास्तव मांडले. त्या म्हणाल्या की, "सध्या राज्यातील सुमारे ९६ टक्के सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना (Un-treated) थेट नद्यांमध्ये सोडले जात आहे. औद्योगिक सांडपाणी, शहरातील सांडपाणी आणि शेतीतील रासायनिक खतांचा वापर यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या भागातील नद्यांचे प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनली आहे." मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि सोलापूर यांसारख्या मोठ्या शहरांमधील नद्यांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.



चंद्रपूरच्या इरई आणि झरपट नद्यांचे होणार पुनरुज्जीवन


चंद्रपूरमधील इरई आणि झरपट या दोन्ही नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेऊन, नवीन प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात या नद्यांचा समावेश केला जाईल. या नद्यांच्या स्वच्छतेसाठी प्राधान्याने काम करून त्यांचा कायापालट केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.



नाग नदी प्रकल्पाला गती; १९२६ कोटींचा आराखडा


नागपूरमधील प्रसिद्ध 'नाग नदी' पुनरुज्जीवनासाठी सरकारने १९२६.९९ कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. सध्या १३ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) कार्यरत असून आणखी ३ नवीन प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.



२०७० पर्यंत 'कार्बनमुक्त महाराष्ट्र'चे उद्दिष्ट


वातावरणीय बदलांच्या गंभीर परिणामांवर भाष्य करताना मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, राज्य सरकार वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देत आहे. २०७० पर्यंत देशाला कार्बनमुक्त करण्याच्या पंतप्रधानांच्या उद्दिष्टाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून, नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण हे या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरेल.

Comments
Add Comment

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा