नाशिकमधील गृहनिर्माण घोटाळ्याची महिनाभरात चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई

मुंबई : नाशिक महापालिका क्षेत्रात गृहनिर्माण नियमांचे उल्लंघन करून गरीबांच्या घरांसाठी राखीव असलेल्या जागेवर डल्ला मारणाऱ्या विकासक आणि अधिकाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून एका महिन्यात अहवाल सादर केला जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले. आमदार देवयानी फरांदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती.


नेमकं प्रकरण काय?


नियमानुसार ४००० चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांमध्ये २० टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, नाशिकमध्ये काही विकासकांनी शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून भूखंडांचे छोटे-छोटे तुकडे दाखवले आणि बनावट नकाशे सादर करून या नियमाला बगल दिली. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांची समिती नेमण्यात आली आहे. एकाच दिवशी भूखंडांचे तुकडे करून मंजुरी घेणे, बनावट मोजणी करणे अशा प्रकारांची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि विकासकांवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा

Alexandra Cinema in Nagpada : नागपाड्यातील अलेक्झाड्रा सिनेमागृहाची ओळख कायमचीच मिटणार

- सिनेमागृहाचे आरक्षण बदलून निवासी वापराचे आरक्षण टाकले जाणार; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई

FDA Action on Blinkit : FDAचा ब्लिंकिटवर मोठा दणका! मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित; झुरळे, अस्वच्छता अन् नियमभंग उघड

मुंबई : राज्यभर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली