फोर्ट कंझर्वेशन प्राधिकरणाबाबत अभ्यास करण्यासाठी कमिटी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या बारा किल्ल्यांना युनोस्कोचा दर्जा मिळाला त्यासह राज्य शासनाकडून संरक्षित आणि असंरक्षित जे गड किल्ले आहेत या किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी अधिक निधी उपलब्ध व्हावा तसेच त्यासाठी "फोर्ट कंझर्वेशन प्राधिकरण" अर्थात "किल्ले संवर्धन प्राधिकरण" असावे का ? याबाबत अभ्यास करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली.


विधानसभेत आज नियम २९३ अंतर्गत आमदार अतुल भातखळकर यांनी चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत आमदार विक्रम सातपुते, बाबाजी काळे, दीपक केसरकर आणि अन्या सदस्यांनी देखील सांस्कृतिक कार्य विभागासंदर्भात विविध प्रश्न, सूचना आणि विभागाच्या उपक्रमांबाबत प्रशंसा केली. या चर्चेला मंत्री आशिष शेलार यांनी उत्तर दिले.


या उत्तरात मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा गड किल्ल्यांना मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, असा दर्जा युनोस्कोने दिला. त्या सगळ्यांसाठी एक स्थळ व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून त्या माध्यमातून या बारा गड किल्ल्यावर माहिती फलक, जन सुविधा केंद्र माहिती केंद्र आणि इतर पर्यटन सुविधा शासनाकडून देण्यात येणार आहेत. भविष्यामध्ये गणेशोत्सव हा युनोस्कोच्या अमूर्त वारसा नामांकनामध्ये जावा यासाठीची प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे. यावर्षी तर पांडुरंगाची वारी हा प्रस्ताव शासन घेऊन जाणार आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने विशेष प्रयत्न केल्यामुळे आपली दिवाळी सुद्धा युनेस्कोच्या अमूर्त वारसा नामांकनामध्ये समाविष्ट झाली हे सुद्धा मंत्री शेलार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.


चर्चेत आमदार अतुल भातखळकर यांनी असंरक्षित किल्ल्यांसाठी सुद्धा संवर्धनाचे धोरण असलं पाहिजे अशी सूचना केली होती. याबाबत मंत्री शेलार यांनी सांगितले की, आपल्याकडे केंद्र सरकारच्या अखत्यारित ५४ किल्ले असून राज्य सरकारकडून संरक्षित ६२ किल्ले आहेत ते सोडून जे संरक्षित असले तरी त्याला ऐतिहासिक आणि काही ठिकाणी वास्तुशास्त्राचे महत्त्व सुद्धा आहे. म्हणून अशा सर्व असंरक्षित गड किल्ल्यांची जिल्हा निहाय प्राथमिक अवस्थेतील नोंदणी करण्याचे काम तंत्रज्ञांच्या मदतीने पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचालनालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये वन विभागातील किल्ल्यांची नोंद पूर्ण झालेली आहे, असे त्यांनी सांगितले.


आमदार अतुल भातखळकर यांनी अतिशय महत्त्वाची सूचना मांडली, की फोर्ट कंजर्वेशन प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, या सूचनेचे मंत्री शेलार यांनी स्वागत केले. ही अतिशय मौल्यवान सुचना असून आपल्याकडे आज जे १२ गड किल्ले आहेत ज्यांना युनोस्कोचे मानांकन मिळालेले त्यासाठी एएसआय प्रस्ताव तयार करीत असून राज्य संरक्षित किल्ल्यांच्या बाबतीमध्ये ६६ किल्ल्यांपैकी ३३ किल्ल्यांवर ६३ कोटी ७१ लाख १५ हजार ११८ एवढ्या निधीतून जतन संवर्धनाचे काम चालू आहे. तरी असंरक्षित आणि उरलेले संरक्षित या सगळ्यासाठी आपल्याला भरीव निधी लागेल. त्यामुळे यासाठी प्राधिकरण करण्याच्या बाबतीमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येईल असे मंत्री शेलार यांनी घोषित केले.

Comments
Add Comment

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Gold Rate Today : ग्राहकांना सोन्यासारखी संधी! बाजारात सोन्याचे दर घसरले; पहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यातच सोन्याच्या दरात सलग

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन