महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा

मुंबई : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा नियमित आहे. नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे; असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.


राज्यात काही ठिकाणी पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवा पसरल्या. यानंतर पेट्रोल, डिझेल भरून घेण्यासाठी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक पेट्रोल पंपांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्‍यांनी एक्स पोस्ट अर्थात ट्वीट करून जनतेला विश्वासात घेतले आहे.


पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. युद्धाने २६ व्या दिवसांत प्रवेश केला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी शत्रू देशांसाठी बंद ठेवणार, असा इशारा इराणने दिला आहे. जे युद्धात शत्रू अथवा शत्रूचे सहकारी म्हणून सहभागी झालेले नाहीत त्यांच्या जहाजांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली आहे. फक्त इराण सरकारशी समन्वय साधून आणि नियमांचे पालन करत संबंधित देशांच्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करता येईल असेही इराणने जाहीर केले. आहे. भौगोलिक स्थितीचा फायदा घेत इराणने युद्ध होर्मुझ सामुद्रधुनी परिसरावर नियंत्रण ठेवले आहे. जगाच्या एकूण तेल व्यापारापैकी २० टक्के व्यापार होर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गाने जाते. यामुळे होर्मुझद्वारे केलेल्या कोंडीचा परिणाम हळू हळू जगावर दिसू लागला आहे. या परिणामांच्या बातम्या येत असतानाच राज्यात पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवा पसरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा नियमित आहे. नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे; असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.



Comments
Add Comment

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही मुंबई : केंद्र

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ