पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

पुणे : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सुरू केलेल्या ‘पीटीपी’ (पुणे ट्रॅफिक पोलिस) अॅपच्या माध्यमातून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधात प्रभावी कारवाई केली जात आहे. आत्तापर्यंत सुमारे अडीच लाख नागरिकांनी ॲपद्वारे तक्रारी केल्या असून, सुमारे नऊ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.शहर वाहतूक शाखेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात ‘पीटीपी’ अॅपद्वारे सर्वाधिक तक्रारी नोंदवणाऱ्या व्यक्तींचा गौरव २३ मार्च रोजी पोलिस आयुक्तालयात करण्यात आला. या वेळी विजेत्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. या योजनेअंतर्गत प्रथम क्रमांकाला ५० हजार, द्वितीय २५ हजार, तृतीय १५ हजार, चतुर्थ १० हजार आणि पाचव्या क्रमांकाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच, अॅपवर प्राप्त तक्रारींवर प्रभावी कारवाई करणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव उपस्थित होते.


वाहतूक शाखेच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे एक लाख ५५ हजारांहून अधिक नागरिकांनी ‘पीटीपी’ अॅपचा वापर केला आहे. या ॲपद्वारे दोन लाख ४९ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची पडताळणी करून एक लाख ७६ हजारांपेक्षा अधिक प्रकरणांमध्ये सुमारे नउ कोटी ३२ लाख ८२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.पुणे महापालिका आणि शहर पोलिस यांच्या वतीने ‘होर्डिंगमुक्त पुणे’ अभियान हाती घेण्यात आले आहे. विशेष मोहीम राबवून अनधिकृत होर्डिंग, रस्त्यावरील बेवारस वाहने हटविण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनी ‘पीटीपी’ अॅपचा वापर करून वाहतूक नियमभंग, बेकायदेशीर होर्डिंग, पार्किंग आणि अडथळे निर्माण करणाऱ्या बाबींची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व