Friday, July 17, 2026

विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पाच्या आड येणाऱ्या वर्सोव्यातील बांधकामांवर कारवाई

विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पाच्या आड येणाऱ्या वर्सोव्यातील बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या वर्सोवा आराम नगर येथील ३३ बांधकामांवर महापालिका के पश्चिम विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये ३ निवासी आणि २९ व्यावसायिक बांधकामांचा समावेश आहे. ही कारवाई करण्यात आल्यामुळे विस्तारित कोस्टल रोडच्या मार्गातील अडथळ दूर करण्यात आल्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळणार आहे.

महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे विशेष मार्गदर्शनाखाली उपायुक्त (परिमंडळ ४) भाग्यश्री कापसे मार्गदर्शनाखाली व के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्पाचे अर्थात विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. वेसावे ते दहिसरदरम्यान होणाऱ्या या मार्गाच्या बांधकामात वर्सोवा येथील आराम नगर परिसरातील बांधकामांमुळे या प्रकल्प कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे, येथील ३३ बांधकामांवर सोमवारी कारवाई करण्यात आली. यामध्ये ३ निवासी आणि २९ व्यावसायिक बांधकामांचा समावेश आहे. दरम्यान, यापैकी एका मालमत्ताधारकाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सुनावणी होणार आहे. तसेच, म्हाडा प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या १२ बांधकामांवरही नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. यातील पात्र कुटुंबांचे पुनर्वसन केल्यानंतर या बांधकामांवर कारवाईर करण्यात आली ‘के पश्चिम’ विभागाचे परिरक्षण विभाग, अतिक्रमण निर्मूलन व अनुज्ञापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही कारवाई केली. यासाठी वर्सोवा पोलीस ठाण्याकडून पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >