Yavatmal Bus Fire : यवतमाळ-भारी विमानतळ मार्गावर मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक; जळत्या ट्रॅव्हल्समधून...

यवतमाळ : वर्धा येथून नांदेडच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी विमानतळ परिसरात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत MH २७००५९ क्रमांकाचे हे वाहन पूर्णतः जळून खाक झाले असून, सुदैवाने सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, सदर मिनी ट्रॅव्हल्स वर्ध्याहून नांदेडकडे जात असताना यवतमाळनजीकच्या भारी विमानतळ परिसरात पोहोचली. यावेळी चालकाला अचानक वाहनातून धूर येत असल्याचे आणि आगीच्या ठिणग्या निघत असल्याचे लक्षात आले. प्रसंगावधान राखून चालकाने तात्काळ वाहन थांबवले आणि आतील प्रवाशांना खाली उतरण्याची विनंती केली. ट्रॅव्हल्समध्ये सुमारे १० प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी खाली उतरताच काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.


आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, बघता बघता संपूर्ण ट्रॅव्हल्सचा कोळसा झाला. भररस्त्यात लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जीवितहानी टळली असली तरी वाहनाचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

Pune Rain : पुणेकरांनो सावध व्हा! मुठा नदीने धारण केले रौद्ररूप; धरण साखळी पूर्ण भरली, सखल भागात सतर्कतेचा इशारा

पुणे : पुणे शहर आणि परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, विदर्भ, पश्चिम

Khopoli Accident : ५० फूट खोल दरीत कोसळली भरधाव कार झाडात अडकली, अन् पुढच्याच क्षणी...खोपोलीत थरारक घटना!

खोपोली : खोपोलीतील गारमाळ रस्त्यावर सोमवारी दुपारी एका कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार

Kolhapur : आरोपी फरार; कोल्हापुरातील बाळूमामांच्या मंदिरात ६० कोटींचा घोटाळा

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध संत बाळूमामा मंदिरात तब्बल ६०

Private Vehicle Police Sticker : खासगी वाहनांवर 'पोलीस' लिहून चमकोगिरी करणे महागात पडणार

- विशेष तपासणी करून कारवाई होणार; वाहतूक विभागाचे राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना पत्र मुंबई : आपल्या खासगी

Women Heart Attack Video : 'अचानक छातीत दुखू लागलं... अन् पुढच्या 5 मिनिटांत जे घडलं ते थक्क करणारं! Video Viral

पुणे बसस्थानकावर महिलेला हार्ट अटॅक; महिला कंडक्टर बनली देवदूत पुणे: पुण्यातील मध्यवर्ती एसटी बसस्थानकावर एक

Maharashtra Karjmafi 2026 : ४ ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे ७ हजार कोटी जमा होणार

मुंबई : राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत पात्र ठरलेल्या