दीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

-‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार नियुक्त्या; खासगी संस्थांना ‘रोस्टर’चे बंधन, राज्यातील हजारो उमेदवारांना दिलासा


मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि खासगी शिक्षण संस्थांमधील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली शिक्षक भरती आता मार्गी लागणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातूनच राबवली जाणार असून, पात्र उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी खासगी संस्थांना आता रिक्त पदांची माहिती भरण्यापूर्वी मागासवर्गीय कक्ष आणि विभागीय आयुक्तांकडून ‘रोस्टर’ (बिंदूनामावली) प्रमाणित करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.


शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल आणि ‘कास्ट्राईब’ शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


शिक्षक भरतीमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर नियमावली आखून देण्यात आली आहे. खासगी शिक्षण संस्थांना त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती पोर्टलवर भरण्यापूर्वी रोस्टर प्रमाणीकरण करून घ्यावे लागेल. ज्या पदांची भरती ‘पवित्र’ पोर्टलद्वारे होईल, त्यांनाच शासन मान्यता दिली जाईल आणि भविष्यात त्यांना वेतनप्रणाली लागू केली जाईल, असे स्पष्ट संकेत देओल यांनी दिले आहेत. यामुळे वशिलेबाजीला चाप बसून केवळ गुणवत्तेच्या जोरावर पात्र उमेदवारांची निवड होणार आहे.



अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सुटणार :


खासगी शाळांमधील ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील अनुकंपा तत्त्वावरील पदेही तातडीने भरली जाणार आहेत. आतापर्यंत प्राप्त झालेल्या १ हजार ४८ प्रस्तावांपैकी ७९१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, उर्वरित प्रस्तावांतील त्रुटी लवकरच दूर केल्या जातील. तसेच, खासगी शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन आता मानवी हस्तक्षेप टाळून ऑनलाइन पद्धतीने अत्यंत पारदर्शकपणे केले जाणार आहे.



समूह शाळांची संकल्पना :


जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळांचे रूपांतर आता 'समूह शाळां'मध्ये करण्याचा विचार शासन करत आहे. ज्या शाळांची पटसंख्या समाधानकारक आहे, तिथे दहावीपर्यंतचे वर्ग जोडण्याबाबत सरकार सकारात्मक आहे.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून