Tuesday, March 10, 2026

सोशल मीडिया स्टार अरुण तुपे याचे अकाली निधन; काय आहे मृत्यूचे कारण...

सोशल मीडिया स्टार अरुण तुपे याचे अकाली निधन; काय आहे मृत्यूचे कारण...

मुंबई : विनोद शैलीने चाहत्यांना खळखळून हसवणारा शिवाय उत्कृष्ट कन्टेन्टने प्रेक्षकानं भारावून सोडणारा छत्रपती संभाजीनगरच्या या कन्टेन्ट क्रिएटरचे अकाली निधन झाले आहे.

प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपे यांचे आज सकाळी ( मंगळवार १० मार्च ) रोजी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर मधल्या राहत्या निवास्थानी तो मृतावस्थेत आढळून आला त्यामुळे सर्वाना धक्का बसला आहे.

इंस्टाग्रामवर २१ तासापूर्वीच अरुणने शेवटची रील पोस्ट केली, रिलच्या कॉमेंट्सना तो उत्तरही देत होता, पण तितक्यात त्याच्यासोबत असं काही घडेल याची कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती.

सोशल मीडियावरची ओळख

कोण अरुण तुपे या नावाने तो इंस्टाग्रामम फेमस होता. त्याचे जवळपास १ लाखांच्या घरात चाहता वर्ग असून तो तरुणवर्गात खूप लोकप्रिय होता. त्याने स्वतःच्या अभिनय कौशल्यावरून, विनोद शैलीवरून अनेकांची मने जिंकली होती, त्यामुळे अरुणच्या अचानक जाण्याने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे.

मृत्यूचे नेमके कारण

नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, मृत्यूचे नेमके कारण समजले नसल्याने छत्रपती संभाजीनगर यामधील घाटी येते त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्याला फिटचा त्रास होता. परंतु निधनामागचं नेमकं कारण हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >