Sunday, July 12, 2026

Indian Seafarers Missing : धक्कादायक! होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर इराणचा हल्ला; ११ भारतीयांपैकी एक खलाशी बेपत्ता, भारताचा तीव्र निषेध

Indian Seafarers Missing : धक्कादायक! होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर इराणचा हल्ला; ११ भारतीयांपैकी एक खलाशी बेपत्ता, भारताचा तीव्र निषेध

नवी दिल्ली : ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. या जहाजावर ११ भारतीय नागरिक कार्यरत होते. त्यापैकी १० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, एका भारतीय खलाशाचा अद्यापही शोध सुरू आहे. (Indian Seafarers Missing)

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) रविवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात असून शोध आणि बचाव मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. या कारवाईसाठी सहकार्य केल्याबद्दल भारताने ओमान सरकारचे आभारही मानले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर भीषण आग लागली. परिस्थिती गंभीर झाल्याने कर्मचाऱ्यांना जहाज सोडावे लागले. इराणने हा हल्ला "इशारा देण्यासाठी केलेली कारवाई" असल्याचा दावा केला असून, जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतील कथित अनधिकृत मार्गाने प्रवास करत असल्याचे म्हटले आहे. तसेच या घटनेवर कोणतीही प्रत्युत्तरात्मक कारवाई झाल्यास त्याला "कठोर उत्तर" दिले जाईल, असा इशाराही इराणने दिला आहे. (Indian Seafarers Missing)

या घटनेमुळे इराण आणि अमेरिकेमधील तणाव आणखी वाढला आहे. प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने इराणमधील क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळ, नौदलाची साधने, दारुगोळा साठे, दळणवळण यंत्रणा आणि किनारी देखरेख केंद्रांवर नव्या हवाई कारवाया केल्या. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनुसार, ताज्या कारवाईत सुमारे १४० लष्करी लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले असून, सलग तीन दिवसांत ३०० हून अधिक लक्ष्यांवर प्रहार करण्यात आला आहे. (Indian Seafarers Missing)

दरम्यान, व्यापारी जहाजांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांबाबत भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तणाव तातडीने कमी करून राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन भारताने केले आहे. तसेच नागरी पायाभूत सुविधा आणि व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे त्वरित थांबवावे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार होर्मुझसह सर्व आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरील जहाजवाहतूक कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवावी, अशी स्पष्ट भूमिका भारताने मांडली आहे. (Indian Seafarers Missing)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा