Sunday, April 12, 2026
Nari Shakti Vandan

Iran Israel War : इराणच्या नव्या सर्वोच्च नेतेपदी मोज्तबा खामेनी येताच इराणकडून इस्त्रायलवर क्षेपणास्त्राचा मारा

Iran Israel War : इराणच्या नव्या सर्वोच्च नेतेपदी मोज्तबा खामेनी येताच इराणकडून इस्त्रायलवर क्षेपणास्त्राचा मारा

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोज्तबा खामेनी यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. इराणच्या सरकारी दूरदर्शनने सोमवारी पहाटे ही घोषणा केली. आयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून परिस्थिती आता नाट्यमय वळणावर पोहोचली आहे.

मोज्तबा खामेनी यांना या पदाचे संभाव्य दावेदार म्हणून बऱ्याच काळापासून पाहिले जात होते. विशेष म्हणजे, मोज्तबा खामेनी यांनी यापूर्वी कधीही कोणत्याही सरकारी पदासाठी निवडणूक लढवली नव्हती आणि त्यांची कोणत्याही अधिकृत पदावर नियुक्तीही झाली नव्हती. इराणच्या ८८ सदस्यीय धार्मिक तज्ज्ञांच्या सभेने (एक्स्पर्ट्स असेंब्ली) मोजतबा खामेनेई यांची देशाच्या नव्या सर्वोच्च नेत्यपदी निवड केली.

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज दहावा दिवस आहे. यादरम्यानच ही घोषणा करण्यात आली आहे. जसे जसे हे युद्ध पुढे जात आहेत, तसे अधिक घातक होत आहे. इराणच्या तेहरानला सर्वाधिक या युद्धाचा झळा बसत आहे.

दहा दिवसांच्या या युद्धात आतापर्यंत इराणच्या दोन सर्वाेच्च नेत्यांना अमेरिकेने ठार केले. आता मोज्तबा खामेनी यांनी इराणच्या सर्वाेच्च नेत्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेचच इस्त्रायलवर घातक क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला केला. मोज्तबा खामेनी यांच्या नियुक्तीनंतर इराणकडून क्षेपणास्त्राचा पहिला मारा केला गेला.

माझ्या मंजुरीशिवाय कोणताही नवीन नेता जास्त काळ टिकू शकणार नाही - ट्रम्प

दरम्यान, मोज्तबा खामेनी यांच्या निवडीला अमेरिकेचा विरोध होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटले होते की, “खामेनी यांचा मुलगा मला स्वीकारार्ह नाही. आम्हाला इराणमध्ये असा नेता हवा आहे जो शांतता आणि सौहार्द निर्माण करेल.”व्हाइट हाऊसने यावर तातडीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ट्रम्प यांनी एका मीडिया चॅनेलशी बोलताना असेही म्हटले होते की, “माझ्या मंजुरीशिवाय कोणताही नवीन नेता जास्त काळ टिकू शकणार नाही.”

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >