Monday, March 9, 2026

Iran Israel War : इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यात ४१ जणांचा मृत्यू

Iran Israel War : इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यात ४१ जणांचा मृत्यू

इस्रायलने लेबनॉनवर मोठा हल्ला केला असून या हल्ल्यात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. नबी शीट येथे झालेल्या हल्ल्यानंतर मोठ्या खड्ड्याभोवती जळालेल्या इमारती, तुटलेली छते आणि जमिनीवर विखुरलेली शस्त्रे दिसून आली.

इस्रायली लष्कराने लेबनॉनमधील नबी शीट परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला होता. नबी शीटचे महापौर हानी मौसावी यांनी सांगितले, “या इशाऱ्यानंतर आम्ही मुलांना वाचवण्यासाठी त्यांना शहराबाहेर काढण्याची तयारी सुरू केली.” लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की नबी शीट आणि आसपासच्या भागात झालेल्या हल्ल्यांमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. स्फोट इतके भीषण होते की एका कारने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन धडक दिली. या हल्ल्यात अनेक इमारती कोसळल्या आणि घरे उद्ध्वस्त झाली. एका उद्ध्वस्त घरात हिजबुल्लाहच्या नेत्यांचे फाटलेले पोस्टरही आढळले.

दरम्यान, इस्रायलने शनिवारी (७ मार्च) लष्करी कारवाईची माहिती देताना सांगितले की १९८६ पासून बेपत्ता असलेल्या नेव्हिगेटर रोन अराद यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी लेबनॉनमध्ये रात्रभर विशेष मोहीम राबवण्यात आली होती. मात्र, त्याबाबत कोणताही ठोस पुरावा किंवा माहिती मिळाली नाही. इस्रायली लष्कराने सांगितले की या ऑपरेशनदरम्यान अराद यांच्याशी संबंधित कोणतीही माहिती मिळाली नाही. तसेच या कारवाईत इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) मधील कोणताही सैनिक जखमी झाल्याची माहिती नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ऑपरेशननंतर सांगितले, “या कारवाईत अराद यांचा कोणताही मागमूस सापडला नाही, पण आपल्या सर्व बेपत्ता सैनिकांना शोधण्याचा इस्रायलचा संकल्प कायम आणि ठाम आहे.”

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >