नागपूरच्या १०९ वर्षांच्या ऐतिहासिक विमानतळाच्या विकासाला आता नवे पंख लाभणार आहेत. ‘जीएमआर एअरपोर्ट्स’कडे विस्तारीकरणाची जबाबदारी सोपविल्याने २०२९ पर्यंत ते देशातील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक आणि कार्गो हब म्हणून उदयास येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारीकरण कार्यक्रम हाती घेण्यासाठी विमानतळ जीएमआर एअरपोर्ट्स या हवाई व्यवसायातील पायाभूत सुविधा उभारणाऱ्या कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षांत हे विमानतळ आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचे एक केंद्र बनल्याशिवाय राहणार नाही. नुकत्याच झालेल्या एका समारोहात हे विमानतळ समूहाकडे हस्तांतरित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,(Devandra fadnavis)) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू, जीएमआर एअरपोर्ट्सचे अध्यक्ष जी. बी. एस. राजू, खा. प्रफुल्ल पटेल, खा. माया इवनाते, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ च्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयावरून राज्यभरात खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तिघा ...
नागपूरचे विमानतळ जवळजवळ १०९ वर्षे जुने विमानतळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार १९१७-१८ मध्ये तत्कालीन इंग्रज सरकारने लष्करी वाहतुकीसाठी रॉयल डिफेन्स सर्विस नावाची सेवा सुरू केली होती. त्यासाठी नागपूरजवळ असलेल्या सोनेगाव परिसरात हे विमानतळ उभारण्यात आले होते. सुरुवातीला या विमानतळाचा उपयोग फक्त लष्करी कामासाठीच केला जात होता. त्यावेळी नागपूर जवळच असलेल्या कामठीमध्ये लष्कराचा एक तळ होता. त्यासाठी हे विमानतळ वापरले जात होते. १९५३ पासून मात्र नागरी विमान वाहतूक या विमानतळावरून सुरू झाली होती. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पोस्टाची डाक वाहून नेणारी विमाने नागपूरला थांबत असत आणि इथे बाकीची देवाणघेवाण केली जात असे. त्यामुळे त्या काळात नागपूर विमानतळावर सर्व विमाने मध्यरात्रीच यायची. १९६९ मध्ये नागपुरात नागपूर विरुद्ध न्यूझीलंड यांचा कसोटी क्रिकेट सामना झाला होता. त्यावेळी दोन्ही कसोटी संघाचे खेळाडू मध्यरात्रीच नागपूरच्या विमानतळावर उतरले होते. १९६३ मध्ये नागपूरला हवाई दलाचे एअर फोर्स मेंटेनन्स कमांड सुरू झाले. त्यामुळे नागपूरच्या सोनेगाव विमानतळाचे महत्त्व अधिकच वाढले.
Nashik : प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांच्या सक्रिय लोकसहभागातून हरित नाशिक साकारण्याचा संकल्प ...
Nashik : प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांच्या सक्रिय लोकसहभागातून हरित नाशिक साकारण्याचा संकल्प ...
Nashik : प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरिक यांच्या सक्रिय लोकसहभागातून हरित नाशिक साकारण्याचा संकल्प ...






