Sunday, March 8, 2026

इराणमध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के

इराणमध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के

तेहरान (वृत्तसंस्था): अमेरिका आणि इस्रायलसोबत तणावपूर्ण परिस्थिती असताना इराणमध्ये शनिवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र बंदर अब्बास या शहरापासून ७५ किमी अंतरावर व जमिनीपासून १० किमी खोल होते. अमेरिका व इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील बंदर अबास येथे भूकंपाचे धक्के जाणवले. शनिवारी ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. याचे केंद्र बंदर अब्बासपासून ७५ किमी पश्चिमेला आणि जमिनीखाली सुमारे १० किमी खोल होते. २८ फेब्रुवारीपासून युद्ध सुरू झाल्यानंतर इराणमध्ये आलेला हा दुसरा भूकंप आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा