Saturday, March 7, 2026

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला मोर्चातर्फे उद्या रविवारी, ८ मार्च रोजी ‘साडी वॉकाथॉन – तिच्या पावलात शक्ती २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम भाजप उत्तर-पश्चिम जिल्हा मुंबई महिला मोर्चातर्फे आयोजित करण्यात आला असून वॉकाथॉनची सुरुवात सकाळी ६ वाजता आरे चेक नाका, वाघदेवी मंदिराजवळ, युनिट १० मैदान येथून होणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश परिसरातील महिलांना एकत्र आणून त्यांच्या शक्ती, एकता आणि नेतृत्वाचा गौरव करून त्यांना प्रोत्साहित करणे हा आहे.

Comments
Add Comment