Saturday, June 20, 2026

FIFA World Cup 2026 Brazil vs Haiti : ब्राझीलचा हैतीवर 3-0 असा दणदणीत विजय; हैतीचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं

FIFA World Cup 2026 Brazil vs Haiti : ब्राझीलचा हैतीवर 3-0 असा दणदणीत विजय; हैतीचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं

कार्लो अँचेलोटी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ब्राझीलने फिफा विश्वचषक २०२६ मध्ये पहिला विजय नोंदवत हैतीचा ३-० असा पराभव केला. या विजयासह ब्राझीलने ग्रुप ‘सी’मध्ये अव्वल स्थान पटकावले, तर हैती हा स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. (FIFA World Cup 2026 Brazil vs Haiti)

सामन्याच्या सुरुवातीपासूनच ब्राझीलने आक्रमक खेळ करत हैतीच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला. इगोर थियागोच्या जागी संधी मिळालेल्या मॅथ्यूस कुन्हाने प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवत शानदार कामगिरी केली. २६व्या मिनिटाला त्याने गोंधळाच्या परिस्थितीत चेंडू जाळ्यात धाडत ब्राझीलचे खाते उघडले. (FIFA World Cup 2026 Brazil vs Haiti)

कुन्हाचा दुहेरी वार, ब्राझीलची मजबूत पकड :

पहिला गोल केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत कुन्हाने आणखी एक अप्रतिम गोल करत ब्राझीलची आघाडी २-० अशी वाढवली. त्याचा हा दमदार फिनिश सामन्यातील आकर्षण ठरला. ब्राझीलचे आक्रमण यानंतरही सुरूच राहिले आणि अतिरिक्त वेळेच्या तिसऱ्या मिनिटाला स्टार खेळाडू विनिसियस ज्युनियरने गोलरक्षकाला चकवत शानदार गोल नोंदवला. त्यामुळे मध्यंतरापूर्वीच ब्राझीलने ३-० अशी भक्कम आघाडी घेतली. (FIFA World Cup 2026 Brazil vs Haiti)

दुसऱ्या सत्रात हैतीचा प्रतिकार :

पहिल्या सत्रात पूर्णपणे दबावाखाली असलेल्या हैतीने दुसऱ्या सत्रात आपली रणनीती बदलत ५-४-१ ऐवजी ४-४-२ अशी मांडणी केली. या बदलाचा त्यांना काही प्रमाणात फायदा झाला. हैतीने बचाव अधिक मजबूत करत ब्राझीलला आणखी गोल करण्यापासून रोखले. सायमनच्या एका जोरदार फटक्याने ब्राझीलचा गोलरक्षक अ‍ॅलिसनची कसोटी पाहिली. अ‍ॅलिसनने उत्कृष्ट बचाव करत संघाला आणखी एका धक्क्यापासून वाचवले. दुसरीकडे, एंद्रिक आणि मार्टिनेली यांना काही संधी मिळाल्या, मात्र हैतीच्या बचावपटूंनी त्यांना रोखण्यात यश मिळवले. (FIFA World Cup 2026 Brazil vs Haiti)

ग्रुप ‘सी’मध्ये ब्राझील अव्वल :

या सामन्यापूर्वी ब्राझीलने मोरोक्कोविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे हा विजय त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. दुसरीकडे, मोरोक्कोने स्कॉटलंडचा १-० असा पराभव केल्यामुळे ब्राझील आणि मोरोक्कोचे गुण समान झाले असले तरी सरस गोलफरकाच्या जोरावर ब्राझीलने ग्रुप ‘सी’मध्ये पहिले स्थान मिळवले आहे. (FIFA World Cup 2026 Brazil vs Haiti)

आता पुढील फेरीतील स्थान आणि गटातील अव्वल क्रमांक निश्चित करण्यासाठी ब्राझीलचा स्कॉटलंडविरुद्धचा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात गोलफरक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. (FIFA World Cup 2026 Brazil vs Haiti)

हैतीचा प्रवास संपला :

पराभवानंतर हैतीचा विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला. मात्र दुसऱ्या सत्रातील त्यांचा लढाऊ खेळ संघासाठी सकारात्मक बाब ठरली. बलाढ्य ब्राझीलविरुद्ध त्यांनी दुसऱ्या अर्ध्यात एकही गोल न स्वीकारता प्रतिकार केला, ही त्यांच्यासाठी दिलासादायक गोष्ट ठरली.

या विजयामुळे ब्राझीलच्या विश्वचषक मोहिमेला वेग मिळाला असून अँचेलोटी यांच्या संघाने स्पर्धेतील आपली दावेदारी अधिक मजबूत केली आहे. (FIFA World Cup 2026 Brazil vs Haiti)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >