कृत्रिम फुले आणि खेळण्यांच्या रंगांमुळे कर्करोगाचा धोका; विक्रम पाचपुते यांचा इशारा

मुंबई: विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी एक गंभीर आरोग्य समस्या जगासमोर मांडली आहे. आपण सजावटीसाठी वापरत असलेली कृत्रिम फुले आणि लहान मुलांची स्वस्त खेळणी यांमधील घातक रंगांमुळे कर्करोग आणि फुफ्फुसांचे आजार बळावत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



नॅनो पार्टिकल्सद्वारे शरीरात शिरकाव


पाचपुते यांनी सांगितले की, कृत्रिम फुलांमधून रंग 'नॅनो पार्टिकल्स'च्या स्वरूपात बाहेर पडतात. हे कण श्वासोच्छवासाद्वारे आपल्या शरीरात जातात, ज्यामुळे श्वसनविकार आणि कर्करोगाचा मोठा धोका निर्माण होतो. त्यांनी एक प्रयोग सुचवला की, एखादा रंगीत फुगा किंवा खेळणे उन्हात ठेवल्यास एका दिवसात त्याचा रंग फिका पडतो. हा रंग हवेत मिसळून प्रदूषण वाढवतो आणि तीच हवा आपण श्वासाद्वारे आत घेतो.



सरकारला विनंती


"कायदे अनेक आहेत, परंतु जोपर्यंत दोषींना शिक्षा (Conviction) होत नाही, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही," असे पाचपुते यांनी नमूद केले. शासकीय कार्यक्रम असोत किंवा घरगुती समारंभ, सर्वत्र कृत्रिम फुलांचा वापर वाढला आहे. यावर सरकारने कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा उत्पादनांवर नियंत्रण आणावे, अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.



चायनीज आणि मिठाईतील घातक रंगांमुळे कर्करोगाचा धोका


"आपण जे अन्न खातोय, त्यातील भडक रंग आपल्या आरोग्यासाठी काळ ठरू शकतात," असा गंभीर इशारा भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी दिला आहे. स्वस्त चायनीज स्टॉल्स आणि मिठाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक रंगांवर जोरदार प्रहार केला. पाचपुते यांनी सांगितले की, बुंदी, जिलेबी आणि विशेषतः स्वस्त चायनीज पदार्थांमध्ये (उदा. शेजवान चटणी किंवा राईस) 'सनसेट यलो' सारखे घातक पिगमेंट्स वापरले जातात. "जर चायनीज खाल्ल्यानंतर केवळ काही सेकंदात तुमच्या हाताचा रंग निघत नसेल, तर विचार करा तुमच्या आतड्यांचे काय हाल होत असतील," असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नैसर्गिक रंगांच्या तुलनेत हे कृत्रिम रंग अत्यंत स्वस्त असल्याने त्यांचा वापर सर्रास होतो, परंतु हे रंग थेट मानवी शरीरासाठी विषारी (Toxic) आहेत.



तंबाखू न खाणाऱ्यांनाही कॅन्सर का?


अनेक लोक तंबाखू, सुपारी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नाहीत, तरीही त्यांना कर्करोग (Cancer) होतो. याचे मुख्य कारण आपण नकळतपणे अन्नाद्वारे शरीरात घेतलेले हे घातक केमिकल्स आणि नॅनो पार्टिकल्स आहेत, असे मत पाचपुते यांनी व्यक्त केले.


या प्रश्नावर शासनाने काय भूमिका घ्यावी, असे विचारले असता पाचपुते म्हणाले की, "कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याकडे सक्षम यंत्रणा नसेल, तर अशा घातक वस्तूंवर थेट बंदी आणली पाहिजे." त्यांनी सरकारला विनंती केली की, नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या रंगांवर कठोर कारवाई करण्यात यावी.



होळीसाठी पालकांना आवाहन


येत्या होळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पालकांना आवाहन केले की, मुलांसाठी खेळणी, पिचकाऱ्या किंवा रंग घेताना ते उन्हात ठेवून तपासा. जर त्यांचा रंग सहज निघत असेल, तर अशी खेळणी मुलांच्या हातात देऊ नका, कारण ती आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत. ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ही एक 'सामाजिक जबाबदारी' (Social Responsibility) असल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज

तीन महिन्यांत संपूर्ण राज्याचे 'ईटीएस' सर्वेक्षण

राज्यातील अवैध उत्खननावर 'एसआयटी'चा हातोडा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा मुंबई :