तीन महिन्यांत संपूर्ण राज्याचे 'ईटीएस' सर्वेक्षण

राज्यातील अवैध उत्खननावर 'एसआयटी'चा हातोडा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा


मुंबई : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढील तीन महिन्यांत संपूर्ण राज्याचे ईटीएस (इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन) सर्वेक्षण आणि गुगल मॅपिंग केले जाईल,अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत केली. त्याशिवाय ठाणे, पालघर, रायगड आणि नवी मुंबई परिसरातील डोंगरांचे लचके तोडणाऱ्या अवैध उत्खननांची सखोल चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली 'एसआयटी' (विशेष तपास पथक) नेमण्याचेही त्यांनी जाहीर केले.


आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूलमंत्री बोलत होते. अनेक ठिकाणी खाणपट्ट्यांची वैधता तपासली गेलेली नाही, पर्यावरण अनुमती नाही आणि स्फोटकांच्या वापरासाठी आवश्यक लायसन्सही नाही. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी आता पुढच्या तीन महिन्यांत मागील पाच वर्षांतील परवानग्यांचा लेखाजोखा घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, अवैध उत्खननातील रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी आयपीएस अधिकारी आणि विभागीय आयुक्तांचा समावेश असलेली एसआयटी नियुक्त केली जाईल. राज्यात नेमके किती गौण खनिज उत्खनन झाले, याचा खरा आकडा समोर येण्यासाठी संपूर्ण राज्याचे ईटीएस सर्वेक्षण केले जाईल. अवैध धंदे कोणाच्या तरी आशीर्वादाशिवाय चालत नाहीत," असे नमूद करत बावनकुळे यांनी मागील ५ वर्षांत अवैध कामांना मूकसंमती देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले.


...तर नोंदणी कायमस्वरुपी रद्द

अवैध वाहतूक करणारा ट्रक तीन वेळा पकडला गेल्यास आरटीओमार्फत त्या वाहनाचे रजिस्ट्रेशन कायमस्वरूपी रद्द केले जाईल आणि पुढील अधिवेशनापर्यंत राज्यातील खाणींच्या अवैध उत्खननाचा संपूर्ण तपशील देणारी 'श्वेतपत्रिका' (पुस्तक) सभागृहासमोर मांडली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.


आरएमसी प्लँटचे होणार 'कॅल्क्युलेशन'

मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या 'रेडी मिक्स काँक्रीट' (आरएमसी) प्लँटमधून जेवढे कॉंक्रीट बाहेर पडले, त्यासाठी किती खडी आणि वाळू लागली याचे गणित मांडले जाईल. रॉयल्टीचा भरणा आणि प्रत्यक्षातील वापर यामध्ये मोठी तफावत आढळत असून, त्यातून कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचा संशय मंत्र्यांनी व्यक्त केला.


शेतकऱ्यांना दिलासा

या चर्चेदरम्यान आमदार दिलीप लांडे, राजू खरे आणि नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलताना मंत्री म्हणाले की, "जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी समन्वयाने पुढील तीन दिवस विशेष मोहीम राबवून अवैध उत्खनन तात्काळ बंद करावे. मात्र, ज्यांच्याकडे वैध परवानग्या आहेत, त्यांचे काम बंद पडणार नाही याची काळजी घेतली जाईल." दरम्यान, शेतकऱ्यांनी स्वतःच्या वापरासाठी किंवा घरकुलासाठी शेतातून मुरूम-रेती काढल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.


१३७ कोटींच्या दंडाचीही होणार चौकशी

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीतील एका खाणीवर प्रलंबित असलेल्या १३७ कोटी रुपयांच्या दंडाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महसूल मंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने माहिती घेऊन वसुलीसाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

Comments
Add Comment

Navnath Ban : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; ‘राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक’

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही

Jal Jeevan Mission : भूजल निधीच्या मनमानी खर्चाला चाप, पाणीटंचाईग्रस्त गावांना मिळणार प्राधान्य; ‘जल जीवन मिशन’ला बळकटी देण्यासाठी विशेष धोरण

मुंबई : केंद्र सरकार, जागतिक बँक आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) भूजल पातळी वाढवण्यासाठी मिळणारा निधी

Sunetra Pawar : बारामतीत 34 कोटींच्या क्रीडा संकुलाची पाहणी; युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी मिळणार, सुनेत्रा पवारांचा विश्वास

बारामती: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलामुळे युवा खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळून त्यांना आंतरराष्ट्रीय

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे सरकारला सवाल; ‘वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत’

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यू

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)