मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईतील निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकाऱ्यांनी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबवावा, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. यासाठी राजकीय पक्षांची बैठक घेऊन प्रत्येक बीएलए (बूथ लेव्हल एजंट) यांची नेमणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी याप्रसंगी केल्या.


भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण करण्याच्या अनुषंगाने, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकविषयक अधिकाऱ्यांची पूर्वतयारीबाबत बैठक वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील पेंग्विन सभागृहात सोमवारी २३ मार्च २०२६ रोजी पार पडली. यावेळी ते बोलत होते.


राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी नवीन महाजन, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) आंचल गोयल, जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा) सौरभ कटियार, महानगरपालिकेचे सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील मतदान नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, नायब तहसीलदार (निवडणूक) आदी यावेळी उपस्थित होते.


राजस्थानमध्ये नुकताच मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी केलेल्या विविध व्यवस्था, आलेल्या अडचणी व निराकरणासाठी केलेल्या उपाययोजना यासंबंधी राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी नवीन महाजन यांनी सविस्तर सादरीकरण केले. तसेच, आगामी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.


महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम पुढे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवावा. राजकीय पक्षांची बैठक घेऊन प्रत्येक बीएलए (बूथ लेव्हल एजंट) यांची नेमणूक करावी, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून, ८९.६० लाखांची मदत

मुंबई : यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून