वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी विवेकानंद मार्ग आणि आर. के. पाटकर मार्ग जंक्‍शन या दरम्‍यान ७५० मिलीमीटर व्‍यासाची मुख्‍य जलवाहिनी नव्‍याने टाकण्यात आली आहे. ही नवीन मुख्‍य जलवाहिनी कार्यान्वित करण्‍याचे काम शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवारी २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्‍यान एकूण १६ तास हाती घेण्‍यात येणार आहे. या कार्यवाही दरम्‍यान ‘एच पश्चिम’ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा रविवारी, २९ मार्च २०२६ रोजी बंद राहणार आहे. तर, काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.


या दुरुस्तीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून - गाळून प्‍यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.



पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर


 

संपूर्ण खार पश्चिम, संपूर्ण सांताक्रुझ पश्चिम व वांद्रे पश्चिम येथील काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते सकाळी ८.३० वा.)


संपूर्ण बाजार मार्ग, जैन मंदीर मार्ग परिसर डि’मोंटे रस्ता परिसर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे ४.०० ते सकाळी ८.३० वा.)


वांद्रे पश्चिमेकडील हिलरोड, पेरीरोड, मॅन्युअल गोन्साल्विस रोड, सेंट अँड्रयूज रोड, सेंट पॉल रोड, डॉमनिक रोड, आर. के. पाटकर रस्ता, न्यू आणि ओल्ड कांतवाडी, रणवार गाव, वरोडा मार्ग, कार्टर रोड, पालीमाला मार्ग, चिंबई गाव, शेर्ली गाव, राजनगाव, मालागाव
आणि पालीगाव (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वा.)


खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, च्युइम गावठाण, गझदरबंद झोपडपट्टीचा काही भाग, खार पश्चिमेकडील काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते रात्री १०.०० वा.)


डॉ. आंबेडकर मार्गालगतचा परिसर, पाली गावठाण,पाली पठार, वांद्रे व खार पश्चिमेचा काही भाग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ रात्री १०.०० ते मध्यरात्री १.०० वा.)

Comments
Add Comment

ST BUS : आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास मुंबई : ‘पंढरीची वारी’ (Pandharpur Wari) ही

BMC NEWS : दादरमध्ये मॅनहोलची जाळी चोरीचा प्रयत्न फसला, झाकण टाकले उघडे

महापालिका कर्मचारी नगरसेवकाच्या प्रसंगावधनाने त्वरीत बसवले

BMC : महापालिका मुख्यालय मुख्य आणि विस्तारीत इमारतींच्या दुरुस्तीवर पुन्हा साडेआठ कोटींचा खर्च

मुंबई : मुंबई महापालिका मुख्यालयातील विस्तारीत सहा मजल्याच्या इमारतीच्या नुतनीकरणाचे काम तब्बल १४ वर्षे सुरु

BMC : मुंबई महापालिका सभागृहातील आवाज होणार बुलंद, करावी लागणार नाही उचलाउचली!

मुंबई : मुंबई महापालिका सभागृहातील पूर्वापार चालत आलेले लटकते माईक हद्पार करून नगरसेवकांचा आवाज बुलंद

BMC News : प्रत्येक इमारतीत स्ट्रेचर जाऊ शकेल अशी लिफ्ट बंधनकारक

महापालिकेच्या डीसी रुल्समध्ये सुधारणा करण्याची भाजप नगरसेविकेची मागणी मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक

Rajawadi Hospital : राजावाडी रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर

४६ वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून ५.५ किलो वजनाची काढली गाठ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द येथील ४६