बारावीचा पेपर दिला आणि आत्महत्या केली; चिठ्ठीत केले 'ते' खुलासे

कल्याण : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परीक्षेचा काळ सुरु आहे. वर्षभर अभ्यासासाठी केलेल्या मेहनतीची परीक्षा चालू आहे. लाखोंच्या संख्येने विविध राज्यातून विद्यार्थी पेपर देत आहेत. अशातच आपण नापास होणार या भीतीने घाबरून कल्याणमधील एका मुलीने आपले जीवन संपवले आहे.


कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात बुधवारी ही घटना उघडकीस आली. संबंधित विद्यार्थिनी वाणिज्य शाखेत बारावीचे शिक्षण घेत होती. नुकतेच दिलेले पेपर अपेक्षेप्रमाणे न झाल्याची खंत तिच्या मनात होती. ‘आपण परीक्षेत नापास होऊ’ या भीतीसोबतच घरच्यांची नाराजी सहन करावी लागेल, या विचारांनी ती तणावाखाली होती, अशी माहिती समोर येत आहे.


परीक्षेच्या निकालाबाबत सतत मनात चाललेल्या भीतीमुळे विद्यार्थिनी मानसिकदृष्ट्या खचली होती. याच अवस्थेत तिने घरातच गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.



नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल


घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत विद्यार्थिनीने, “माझे पेपर चांगले गेले नाहीत. मला आई-वडिलांना त्रास द्यायचा नाही,” असे शब्द लिहिले होते. या ओळींमधून तिच्या मनातील भीती आणि अपराधीपणाची भावना स्पष्ट होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


या घटनेमुळे परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक दबाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गुण, निकाल आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Delivery Boy Police Verification : यापुढे ‘डिलिव्हरी बॉईज’ची तपासणी बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

कामगार मंत्र्यांचे गृह विभागाला सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश मुंबई : ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि

Gautam Birhade : गौतम बिर्‍हाडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे नवे संचालक

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) संचालक (प्रकल्प) पदी ज्येष्ठ अभियंता गौतम बिर्‍हाडे (Gautam Birhade)

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

Pakistan : इराण-अमेरिका युद्धाचा पाकिस्तानला दणका; इंधनाचे दर भडकल्याने जनता रस्त्यावर, देशात 'एनर्जी लॉकडाऊन'!

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची झोप