मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी खाटांची माहिती ही डॅशबोर्ड स्वरूपात महानगरपालिकेच्या पोर्टल वर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनास निर्देश देण्यात आले असून सद्यस्थितीत या डॅश बोर्डची तपासणी सुरू असून लवकरात लवकर नागरिकांना ही सेवा उपलब्ध होणार आहे ,यामुळे आता नागरिकांना एका क्लिक वर एकूण रुग्णशय्या आणि रुग्ण भरतीसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णशया इत्यादीची माहिती मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना रुग्णाला दाखल करताना ही माहिती मिळणार असल्याने त्यांचा रुग्णालयातील हेलफाटे आणि वेळ वाचला जाईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली आहे


महापौर रितू तावडे यांच्या दालनात भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य खात्याचा आढावा घेण्यात आला. यावेळीमहानगरपालिकेच्या आरोग्य सेवा सुविधा रुग्णालय इत्यादी बाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, संचालक (आरोग्य ), तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.


यावेळी झालेल्या चर्चेत, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत तसेच रुग्णालयामार्फत खरेदी करावयाची साधने, संसाधने, औषधे इत्यादी सर्व प्रकारची खरेदी ही यापुढे भारत सरकार पुरस्कृत जेम पोर्टल मार्फत करावी असा निर्णय घेण्यात आला आहे, यामुळे महानगरपालिकेचा आरोग्य विभागातील कारभारामध्ये पारदर्शकता व सुसूत्रता येईल. या निर्णयामुळे सर्व वस्तूंची उपलब्धता लवकरात लवकर होऊन नागरिकांना याचा लाभ होईल असा विश्वास भांदिर्गे यांनी व्यक्त केला.


तसेच महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयामध्ये २००० पेक्षा जास्त रुग्णशयाची वाढ ही विविध पुनर्विकास प्रकल्प व नव्याने येणारे रुग्णालय यामध्ये होणार आहे. ही रुग्णालये टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करून नागरिकांना आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यामध्ये सर्व प्रकारच्या सर्वसाधारण, विशेष व अतिविशेष स्वरूपाच्या सेवेचा समावेश आहे. भारत सरकारच्या डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवून ही उपनगरीय रुग्णालय दर्जेदार सेवा देण्यास सक्षम होणार आहेत , याशिवाय कार्डिओलॉजी नेफ्रॉलॉजी इत्यादी अतिविशेष स्वरूपाच्या सेवा उपनगरीय रुग्णालयात अंतिम टप्प्यात सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती भांदिर्गे यांनी दिली. अशाप्रकारे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेमध्ये दर्जोन्नती होणार आहे


याशिवाय औषधांची उपलब्धता, सार्वजनिक खाजगी सहभाग धोरणाअंतर्गत येणाऱ्या सेवा सुविधा, इत्यादी बाबत आढावा घेऊन प्रशासनास निविदेतील अटी व शर्तीचे कठोर पालन करण्याबाबत योग्य ती कारवाई करावी व नागरिकांना सेवा या महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या दरातच उपलब्ध व्हाव्यात अशाही सूचना करण्यात आल्याचे भांदिर्गे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Revised process of Aadhaar authentication : वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया

मुंबई : वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान व प्रमाणित ऑनलाइन

Hit-and-run : विले पार्ले हिट-अँड-रन; १९ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थ्याची ₹५ हजारांच्या जामिनावर सुटका

मुंबई : विले पार्ले पश्चिम येथे १८ ऑगस्ट रोजी घडलेल्या कथित हिट-अँड-रन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय

Ashish Shelar : मुंबईतील शाळांच्या भौतिक सुविधा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरा; पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे निर्देश

तपासणी अधिकाऱ्यांची 89 पदे रिक्त https://prahaar.in/2026/08/24/why-are-jihadis-who-throw-eggs-at-the-ganesh-procession-even-needed-in-maharashtra-minister-nitesh-rane-asks-angrily/ मुंबई : मुंबई महापालिका

Pune MHADA Lottery 2026 : पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी; म्हाडाकडून ४,४६२ घरांसाठी सोडत जाहीर

पुणे : पुणे आणि आसपासच्या परिसरात स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाच्या पुणे मंडळाने एक अत्यंत

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून, ८९.६० लाखांची मदत

मुंबई : यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय