Pakistan : इराण-अमेरिका युद्धाचा पाकिस्तानला दणका; इंधनाचे दर भडकल्याने जनता रस्त्यावर, देशात 'एनर्जी लॉकडाऊन'!

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची झोप उडाली आहे. या आंतरराष्ट्रीय तणावाचा मोठा फटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसला असून देशात इंधनाच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, सरकारला संपूर्ण देशात 'एनर्जी लॉकडाऊन' लागू करावा लागला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे पाकिस्तानी जनतेचा संयम सुटला असून, कराचीपासून पेशावरपर्यंत जनक्षोभ पाहायला मिळत आहे. 'डॉन' वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कराची, हैदराबाद आणि सुक्कुर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये नागरिक आणि राजकीय नेत्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आहेत. जैकोबाबादसह अनेक ठिकाणी महागाईविरोधात संताप व्यक्त केला जात असून, वाढत्या किमतींमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे जागतिक युद्धाची भीती आणि दुसरीकडे देशांतर्गत पेटलेले आंदोलन यामुळे पाकिस्तान सरकार पूर्णपणे बॅकफूटवर आले आहे.



अंगावर 'कफन' ओढून सरकारचा निषेध


">पाकिस्तानातील वाढत्या महागाईने आता टोक गाठले असून, सुक्कुरमध्ये 'सिंध युनायटेड पार्टी'ने (SUP) सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी एक आगळेवेगळे आंदोलन केले. महागाई आणि इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी चक्क अंगावर 'कफन' परिधान करून प्रेस क्लबसमोर प्रतीकात्मक उपोषण केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना SUP चे नेते ऐदान जागीरानी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने पेट्रोलच्या दरात ८० रुपयांची कपात केल्याचा दावा केला होता, मात्र हा दावा पूर्णपणे फसवा आणि जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे जागीरानी यांनी म्हटले. गेल्या काही आठवड्यांत पेट्रोलच्या दरात तब्बल १३७ रुपये प्रति लिटर इतकी प्रचंड वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. केवळ इंधनच नाही, तर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही गगनाला भिडल्याने सामान्य माणसाच्या खिशाला मोठी झळ सोसावी लागत असल्याचे आंदोलकांनी नमूद केले.



PTI सह कामगार संघटना रस्त्यावर


सुक्कुरमध्ये 'पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ'च्या (PTI) कार्यकर्त्यांनी गोहर खान खोसो यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली. यावेळी बोलताना खोसो यांनी सरकारला इशारा दिला की, "पेट्रोलचा दर ३७८ रुपये प्रति लिटर झाल्यामुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. सरकारने तात्काळ कर कपात न केल्यास हे आंदोलन संपूर्ण पाकिस्तानात पसरेल. तीर चौक ते घंटा घर दरम्यान नूर अहमद कटियार आणि सरवन जतोई यांच्या मार्गदर्शनाखाली अवामी तहरीकने विशाल रॅली काढत धरणे आंदोलन केले. सरकारची धोरणे सर्वसामान्यांच्या मुळावर उठल्याची टीका यावेळी करण्यात आली. कराचीमध्ये 'नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन' आणि 'होम-बेस्ड विमेन वर्कर्स फेडरेशन'सह अनेक कामगार संघटनांनी एकत्र येत इंधन दरवाढीचा निषेध केला. आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांच्या दबावाखाली सरकार घेत असलेल्या निर्णयांचा त्यांनी निषेध केला.

Tags
karachiIran Israel warpakistan news
Comments
Add Comment

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून

Islamabad Hospital Fire : इस्लामाबाद रुग्णालयात गायनेकोलॉजी वॉर्डला भीषण आग; अवघ्या एका बाळाला वाचवण्यात यश, १५ चिमुकल्यांचा होरपळून अंत

इस्लामाबाद : वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि संवेदनशील मनांना चटका लावून जाणाऱ्या दोन अत्यंत

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,