Gautam Birhade : गौतम बिर्‍हाडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे नवे संचालक

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) संचालक (प्रकल्प) पदी ज्येष्ठ अभियंता गौतम बिर्‍हाडे (Gautam Birhade) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिर्‍हाडे यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. 'एमएमआरसी'च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी त्यांचे स्वागत केले.


भारतीय रेल्वे सेवा अभियंता केडरमधील वरिष्ठ अधिकारी असलेल्या बिर्‍हाडे यांना रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रातील ३३ वर्षांहून अधिक काळ कामाचा अनुभव आहे. त्यांनी पुणे येथील 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी, तर बंगळुरूच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'मधून पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. विशेषतः भूमिगत मेट्रो मार्गिका आणि गुंतागुंतीच्या रेल्वे प्रणालींच्या अंमलबजावणीत त्यांचा हातखंडा मानला जातो.


या नियुक्तीपूर्वी बिर्‍हाडे पुणे महा-मेट्रोमध्ये कार्यकारी संचालक (भूमिगत) म्हणून कार्यरत होते. पुणे मेट्रोच्या आव्हानात्मक भूमिगत टप्प्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी त्यांच्याच देखरेखीखाली झाली. त्याआधी त्यांनी मध्य रेल्वेमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना अनेक पायाभूत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात यश मिळवले आहे.

Comments
Add Comment

State Examinations : राज्यातील सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती

'टीईटी' पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सरकारचे पाऊल; दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : राज्यात

Passive Euthanasia : इच्छामरणासाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत समित्या स्थापन करणार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही; खासगी रुग्णालयांचाही समावेश मुंबई : मागील काही वर्षांपासून

Devendra Fadnavis : तटकरे - पटेलांनंतर पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

- महायुतीतील समन्वय आणि पक्षांतर्गत नाराजीवर चर्चा; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण मुंबई : राष्ट्रवादी

Eknath Shinde : मणिपूरमध्ये सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती उभारणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 'ईशान सेतू' उपक्रमात सहभागी मुंबई

Kurla Incident : कुर्ल्यातील शितल तलावात १९ वर्षीय युवक बुडाला; शोधकार्य सुरू

मुंबई : मुंबईतील कुर्ला (Kurla) पश्चिम येथील शितल तलावात (Sheetal Talao) शुक्रवारी (१७ जुलै) एका १९ वर्षीय तरुण बुडाल्याची (Drowning)

BMC : धारावी, काळा किल्ला बेस्ट बस आगाराची जागा धारावी विकास प्रकल्पासाठीसाठी हस्तांतरीत

महापालिका सभागृहात बहुमताने प्रस्ताव मंजूर मुंबई : धारावी (Dharavi) बस डेपोची जागा पीपीपी तत्त्वावर धारावी विकास