घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे, १० एप्रिल २०२६ पासून या दोन्ही कप्प्यांमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दुरुस्ती दरम्यानच्या काळात पाणीपुरवठ्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या. तरीही, दुरुस्तीपूर्वी असलेल्या वेळाप्रमाणेच १० एप्रिलपासून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पुढील ५ दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे. तसेच, काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


पाणीपुरवठा क्षेत्र नारायणनगर आणि झोन क्रमांक एनएक्स ०३ शी संबंधित चिरागनगर, आझाद नगर, गणेश मैदान, पारशीवाडी, न्यू माणिकलाल इस्टेट मार्ग, एनएसएस मार्ग, महिंद्रा पार्क, डी. एस. मार्ग, खालाई गाव, किरोळ गाव, विद्याविहार (पश्चिम), हंसोटी गल्ली, खोत गल्ली, महात्मा गांधी मार्ग, नवरोजी गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, ध्रुवराजसिंह गल्ली, गोपाळ गल्ली, जीवदया गल्ली, गीगावाडी या परिसरामध्ये दुरुस्तीदरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० वाजता आणि रात्री १०.४५ ते ११.३० वाजता होती. दुरुस्तीनंतर या परिसरात सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी ३.१५ ते सायंकाळी ७.१५ वाजेदरम्यान राहील.


पाणीपुरवठा क्षेत्र पंतनगर आऊटलेट आणि झोन क्रमांक एनएक्स ०६ शी संबंधित भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, क्राईम ब्रांच परिसर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, सी. जी. एस. वसाहत, गंगावाडी, ध्रुवराजसिंह गल्ली, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एम. टी. एन. एल.) गल्लीत, ए. जी. एल. आर. मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्गालगत घाटकोपर (पश्चिम) ते श्रेयस सिग्नलपर्यंतचा परिसर आदी भागात दुरुस्तीदरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ६.१५ ते रात्री १०.३० वाजता होती. दुरुस्तीनंतर या परिसरात सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ६.४५ ते रात्री ११.०० वाजेदरम्यान राहील.


पाणीपुरवठा क्षेत्र सर्वोदय बुस्टींग आणि झोन क्रमांक एनएक्स ०६ शी संबंधित सॅनिटोरियम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, गोपाळ गल्ली, लाल बहादूर शास्त्री (एल. बी. एस.) मार्गालगत घाटकोपर (पश्चिम), गांधीनगर या परिसरात दुरुस्तीदरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.१५ वाजेदरम्यान होती. दुरुस्तीनंतर या परिसरात सुधारित पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.१५ वाजेदरम्यान राहील, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि